Viral Story: चीन देशातील एक महिलेसोबत आश्चर्यकारक गोष्ट घडली. संबंधित महिला सामान आणण्यासाठी बाजारात गेली. पण, तिचा हा प्रवास तिचं आयुष्यच बदलून टाकेल, याबद्दल तिला कल्पना नव्हती. त्या दिवशी अचानक बाजारात पाऊस कोसळू लागला आणि ती महिला पावसाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी एका दुकानात गेली. तिथे तिने कसलाच विचार न करता, मजेतच एक लॉटरीचं तिकीट खरेदी केलं आणि आश्चर्याची बाब म्हणजे, महिलेनं विकल घेतलेल्या तिकीटावरच लॉटरी लागली आणि तिने 1 लाख 80 हजार अमेरिकन डॉलर्स जिंकले.
ADVERTISEMENT
8 ऑगस्ट रोजी, चीनच्या युनानी प्रांतातील युक्सी येथे एक महिला मुसळधार पावसात फसली आणि स्वत:च्या बचावासाठी ती एका लॉटरीच्या दुकानात घुसली. दुकान मालकाच्या म्हणण्यानुसार, "तुमच्याकडे स्क्रॅच कार्ड आहेत का?" असं संबंधित महिलेनं विचारलं.
लॉटरी दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे जी दररोज किंवा प्रत्येक आठवड्याला काढली जाते आणि दुसरी म्हणजे स्क्रॅच कार्ड, ज्यामध्ये तुम्ही जिंकला आहात की नाही? हे लगेच कळतं. या स्क्रॅच कार्डमध्ये लोक थोडे पैसे लावून लाखो युआन (चिनी चलन) जिंकू शकतात. संबंधित महिलेनं त्यावेळी संपूर्ण स्क्रॅच कार्ड खरेदी केलं, ज्यामध्ये 80 तिकीटं होती. प्रत्येक तिकीटाची किंमत 30 युआन (जवळपास 4 अमेरिकन डॉलर्स). यामध्ये महिलेचे 900 युआन खर्च झाले.
हे ही वाचा: मुंबईची खबर: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नेमकं कधी सुरू होणार? सिडको अधिकाऱ्यांनी दिली मोठी अपडेट...
सहाव्या तिकीटावरच मिळाले 10 लाख रुपये
आश्चर्याची बाब म्हणजे महिलेला केवळ सहाव्या तिकीटावरच तब्बल 10 लाख युआनचं बक्षीस मिळालं. त्यावेळी महिला म्हणाली, "माझे हातपाय थरथरत आहेत, मी स्वप्नातही याचा विचार केला नव्हता. कदाचित पाणी तुमच्या आयुष्यात समृद्धी आणते, असं म्हटलं जातं आणि ते खरं झालं."
हे ही वाचा: पतीने केलेलं 'ते' भाकीत खरं ठरलं! रात्री दारूच्या नशेत घरी आला अन् पत्नीने साडीनेच...
11 ऑगस्ट रोजी संबंधित महिलेनं जिउपाई न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, त्या लॉटरी शॉपमध्ये एक जाहिरात चालू होती, "50 युआन (7 अमेरिकन डॉलर्स) खर्च करा आणि 20 मोफत मिळवा. 1,000 युआन (140 अमेरिकन डॉलर्स) खर्च करा आणि 1,000 मोफत मिळवा. मोफत असल्याकारणाने महिलेनं लॉटरीच्या तिकीटांचं पूर्ण पुस्तकच खरेदी केलं.
महिलेनं सोशल मीडियावर केलं शेअर
या महिलेनं कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबद्दल कोणतीच बातमी शेअर न करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःला कमी लेखण्याचं ठरवलं. ती म्हणाली, "मला माझ्या फीडवर अशाच बऱ्याच लोकांना 5 किंवा 10 मिलिअन युआन जिंकताना पाहते. त्या तुलनेत, माझं यश तर काहीच नाही."
ADVERTISEMENT
