Bride Shocking Viral News : मध्यप्रदेशच्या उज्जेनमध्ये बडनगर पोलिसांनी एका गँगचा पर्दाफाश केला आहे. एक व्यक्ती त्याच्या पत्नीचं वेगवेगळ्या तरुणांसोबत लग्न लावायचा आणि त्यानंतर ती महिला सर्वात भयंकर कृत्य करायची. लग्न झाल्यानंतर महिला लाखो रुपयांसह दागिने चोरून सासरच्या घरून फरार व्हायची. या चोरट्या नवरी विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या गँगचा पर्दाफाश केला.
ADVERTISEMENT
बडनगरच्या भाट पचलाना पोलीस स्टेशनच्या प्रभारी सत्येंद्र सिंह चौधरी यांनी म्हटलंय की, ग्राम खरसोद येथे राहणाऱ्या रतनलाल सेनचा मुलगा जितेंद्रचं लग्न होत नव्हतं. जितेंद्रसाठी अनेक स्थळ पाहिले होते. पण प्रत्येक ठिकाणी काही ना काही अडचण येत होती. काही दिवसांपूर्वी रतनलाल खाचरोद येथे राहणाऱ्या विष्णू बाईच्या संपर्कात आला होता. त्यानंतर त्याने मुलाचं लग्न जुळत नसल्याची समस्या विष्णू बाईला सांगितली.
21 ऑगस्ट रोजी नवरी झाली बेपत्ता आणि..
रतनलालची समस्या ऐकल्यावर विष्णू बाईने रतनलालला नागदा येथे राहणाऱ्या नेहा नावाच्या तरुणीबाबत सांगितलं. परंतु, नेहाचे कुटुंबीय गरिब असल्याचं सांगत त्यांच्याकडे दीड लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर नेहा आणि जितेंद्रचं लग्न 14 ऑगस्ट रोजी गावातील एका मंदिरात केली होती. सुरुवातीला सर्वकाही ठीक सुरु होतं. पण 21 ऑगस्टच्या सकाळी नेहा अचानक गायब झाली होती, तेव्हा सर्व लोक घाबरले होते. नेहाला शोधण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतरही नवरीचा पत्ता लागला नाही. त्यानंतर भाट पचलाना पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. जितेंद्रने लग्नाच्या नावाखाली त्याच्या कुटुंबियांना धोका दिल्याचंही या तकारीत म्हटलं गेलं.
हे ही वाचा >> मनसेला मतं पडतात जर सगळंच काढलं तर 10-12 वर्षांचा खेळ... मतांच्या चोरीवरून राज ठाकरेंचं रोखठोक विधान
चोरट्या नवरीच्या गँगचे सदस्य अटकेत
भाट पचलाना पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, तेव्हा चोरटी नवरी आणि तिच्याशी जोडलेल्या गँगचा पर्दाफाश झाला. चोरट्या नवरीचं नाव नेहा नव्हतं, तर पूजा असल्याचं समोर आलं. पूजा आधीपासून विवाहित होती. पोलिसांनी तिला तिच्या राहत्या घरी अटक केली. तिच्याकडे पोलिसांना 40 हजार रुपये रोख रक्कम आणि काही दागिने मिळाले. भाट पचलाना पोलिसांनी नागदा येथे राहणारी चोरटी पूजा उर्फ नेहा, खाचरोद येथे राहणारा रामचंद्र, विष्णू बाई आणि नागदा येथे राहणारा जस्सू उर्फ राजूला अटक केली. याप्रकरणी पोलीस चोरट्या नवरीचा खरा पती विनोद मालवीय आणि आशा बाईचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा >> मुंबईत खळबळ! लोकमान्य टिळक स्थानकाच्या एसी कोचच्या शौचालयात लहान मुलाचा मृतदेह, सूरत येथून अपहण अन् भयंकर कांड
ADVERTISEMENT
