Today Shocking Viral News : सोशल मीडियावर तरुणांना जाळ्यात अडकवून त्यांचे अश्लील व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणाऱ्या दोन भामट्यांना झांसी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना झांसी येथील रक्सा येथून ताब्यात घेतलं. या दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी आता या गँगच्या अन्य लोकांचा शोध सुरु केला.
ADVERTISEMENT
हे दोन्ही आरोपी मुलीचा वेश धारण करून तरुणांना त्यांच्या जाळ्यात अडकवायचे आणि त्यांच्यासोबत चॅटिंग करायचे. एखादा तरुण त्यांच्या जाळ्यात अडकला की, ते नंतर त्याचा न्यूड व्हिडीओ रेकॉर्ड करायचे. त्यानंतर हे आरोपी त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडे पैशांची मागणी करायचे.
145 लोकांची केली फसवणूक अन् नंतर..
जे दोन्ही आरोपी पकडण्यात आले, ते मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. एकाचं नाव गजराज असून दुसऱ्याचं ननाव संदीप लोधी आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 3 मोबाईल आणि 5 सिमकार्ड जप्त केले. या गँगने आतापर्यंत 145 लोकांची फसवणूक केल्याची माहिती समोर आलीय. त्यांनी या लोकांकडून सात लाखांहून अधिक रुपये वसूल केले आहेत. दोन्ही आरोपींनी फेसबुक, इन्स्टाग्रामवर मुलींच्या प्रोफाईलची आयडी बनवली होती.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: तब्बल 26 लाख लाडक्या बहिणी ठरणार अपात्र? सरकार आता कारवाईच्या मूडमध्ये!
आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, त्यांनी मुलींच्या नावाने फेसबुक, इन्स्टाग्रावर प्रोफाईल बनवलं होतं. त्यानंतर ते समोरच्या व्यक्तीला न्यूड व्हिडीओ कॉल करायला सांगायचे आणि नंतर ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचे. मुलींचा फेक फोटो बनवून ते लोकांना पाठवायचे आणि नंतर त्यांच्यासोबत अश्लील चॅट करायचे, असंही आरोपींनी पोलिसांना सांगितलं.
न्यूड व्हिडीओ बनवून लोकांना ब्लॅकमेल करायचे आणि..
न्यूड व्हिडीओ बनवल्यानंतर आरोपी क्राईम पोलीस अधिकारी बनून त्या लोकांना फोन करायचे. त्यांचा न्यूड व्हिडीओ आला आहे, असं त्यांना सांगायचे. कारवाई करण्याची धमकीही त्यांना द्यायचे. या संपूर्ण प्रकरणाबाबत झांसीच्या सीओ अरीबा नोमान यांनी म्हटलं की, झांसीच्या रामगढमध्ये दोन सायबर भामट्यांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून सेक्स रॅकेट आणि हनि ट्रॅपचा रॅकेट चालवायचे. त्यानंतर लोकांना धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळायचे.
ADVERTISEMENT
