Maharashtra Weather : राज्यात 8 जुलै रोजी हवमानाच्या सविस्तर अंदाजाबाबतची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जुलै महिना हा मान्सूनचा मुख्य काळ आहे. भारतीय हवमान विभागाच्या (IMD) च्या ताज्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाट परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील विविध भागांनुसार 8 जुलै रोजीचा हवमानाचा अंदाज खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : दोन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, आता पतीनेच चार्जरच्या वायरने आवळला पत्नीचा गळा, धक्कादायक कारण आलं समोर
कोकण
कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता अधिक आहे. तसेच हवमान विभागाने रेड अलर्टची शक्यता वर्तवली आहे. यामुळे सखल भागात पाणी साचून हवमान विभागाने वाहतूक समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होता. यातील पुणे आणि सातारा येथे 120 मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. अशातच शेतकऱ्यांना पेरणी आणि शेतीच्या कामांसाठी सावधगिरी बाळगण्याचा हवमान विभागाने सल्ला दिला.
मराठवाडा
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर. जालना आणि बीडमध्ये मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी 20-50 मिमी पाऊस पडू शकतो. तापमान 24-31 अंश सेल्सिअस, आर्द्रता जास्त राहील.
विदर्भ
तर विदर्भातील नागपूर, अमरावती आणि चंद्रपूरमधील पावसाचा अंदाज हवामान विभागाने जारी केला. विदर्भातील पावसाची तीव्रता कमी असेल. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा मान्सून हजेरी लावणार आहे. तर ढगाळ वातावरण निर्माण होऊन उकाडा जाणवेल.
हेही वाचा : 'त्याचे' 37 वर्षाच्या महिलेसोबत सुरू होते अनैतिक शारीरिक संबंध, पत्नीला समजलं अन्...
खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, धुळे येथे हलका ते मध्यम स्वरुपाचा मान्सून अपेक्षित आहे. नाशिक येथे काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
