Maharashtra Weather : राज्यात अवकाळीचं संकट टळलं, मात्र 'या' जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकणार

मुंबई तक

• 05:00 AM • 08 Apr 2026

Maharashtra Weather : अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठी हानी निर्माण झाली आहे. अशातच आता वातावरणात आता उष्णतेची लाट येण्याची अधिक शक्यता आहे. अशातच 8 मार्च 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज कसा असेल हे पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आले. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात उष्णतेची लाट

point

8 मार्च 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठी हानी निर्माण झाली आहे. अशातच आता वातावरणात आता उष्णतेची लाट येण्याची अधिक शक्यता आहे. अशातच 8 मार्च 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज कसा असेल हे पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 13 वर्षीय मुलीच्या पोटात चार महिन्यांचं बाळ, नराधमाचा मुलीवर पाशवी बलात्कार

कोकण 

कोकण विभागात हवामान उष्ण आणि दमट राहण्याची अधिक शक्यता आहे.  मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांत अवकाळी पावसाचं संकट नाही. या विभागात आर्द्रता अधिक असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. या विभागातील पुणे, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यता आहे. या विभागातील लोकांनी दुपारी घराबाहेर पडताना काळजी कारवी, असा हवामानाचा अंदाज आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला होता. पण सध्या वातावरणात काही प्रमाणात बदल झाल्याची माहिती समोर आली. या विभागांपैकी जालना, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांत हवामान उष्ण आणि कोरडं राहण्याची अधिक शक्यता आहे. 

हे ही वाचा : अनारकलीचे 70 वर्षीय वृद्धावर प्रेमसंबंध, नवऱ्याला समजताच मध्यरात्री 2 वाजता कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं

विदर्भ

विदर्भात देखील वातावरणात काही प्रमाणात बदल होताना दिसतो. अशातच नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा या जिल्ह्यांत हवामान विभागाने उष्ण तापमानाचा अलर्ट जारी केला.