Maharashtra Weather: गणरायाचं विसर्जन अन् वरूणराजाची हजेरी, कोकणात अतिमुसळधार पाऊस

maharashtra weather today: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नुसार 6 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने राज्यभरात पावसाची तीव्रता असेल असा अंदाज वर्तवला.

Mumbai Tak

मुंबई तक

06 Sep 2025 (अपडेटेड: 06 Sep 2025, 02:01 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभागाचा अंदाज

point

राज्यातील हवामान स्थितीचा अंदाज

हे वाचलं का?

Maharashtra Weather: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नुसार 6 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने राज्यभरात तीव्र पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावरील भागात आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. एकूण राज्यातील हवामान स्थितीचा अंदाज जाणून घेऊयात.

हे ही वाचा : तरुणीचं नुकतंच झालं होतं लग्न, कॉलेजला जाऊन येते असं म्हणाली अन् बॉयफ्रेंडसोबत गेली पळून, शोध घेताच फोनवर...

कोकण विभाग :

कोकण विभागात हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यापैकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मध्यम स्वरुपाचा हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे. कमाल तापमान 32 -34 अंश सेल्सिअस आणि किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र :

राज्यात उत्तर महाराष्ट्रातील हवामान विभागाने धुळे, नंदुरबारमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. जळगाव, नाशिक आणि नाशिकच्या घाट माथ्यावरील हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला. पुण्यातील विभागात अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर पुणे आणि कोल्हापूरच्या घाट भागात हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हे ही वाचा : पतीनं बायकोला समजावलं तरीही बाहेर सुरु होतं लफडं, दोघांमध्ये अनेकदा झाला वाद, नंतर नवऱ्याने विष प्यायलं अन्...

मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर :

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये हलका ते मध्यम स्वरुपात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी वीज कोसळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विदर्भात अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा आणि चंद्रपूरमध्ये वीज कोसळणे आणि वादळाची शक्यता आहे, परंतु पावसाची तीव्रता कमी राहील, असे हवामान विभागाने सांगितलं आहे. 

 

    follow whatsapp