Maharashtrea Weather : हिवाळा ऋतू सुरु झाला असला तरी राज्यात नोव्हेंबर महिन्यात किमान सरासरीच्या तुलनेत अधिक तापमान राहिल असा हवामान विभागाने इशारा दिला आहे. नोव्हेंबर महिन्यात थंडावा कमी जाणवेल, असा हवामान विभागदाने अंदाज वर्तवलेला आहे. तसेच देशातील अनेक भागांमध्ये किमान तापमान हे सरसरीहून अधिक राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील संपूर्ण देशात नोव्हेंबर महिन्यात अधिक पावसाचा अंदाज जारी करण्यात आलेला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'राज ठाकरेंच्या छातीवर बसेन', परप्रांतीय सेक्युरीटी गार्डची मुजोरी, मनसैनिकांनी चोप देताच नरमला, व्हिडिओ व्हायरल
कोकण विभाग :
कोकण विभागात 4 नोव्हेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस राहिल अशी हवामान विभागाने शक्यता वर्तवलेली आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला असून बीडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तसेच हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाची पावसाची स्थिती असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : मोठ्या पडद्यावरील 'खाष्ट सासू'... दिग्गज अभिनेत्री दया डोंगरेंचं निधन!
विदर्भ विभाग :
राज्यातील विदर्भ विभागात हवामान विभागाने बुलढाणा, अकोला, वर्धा, वाशिम, यवतमाळ,अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांत हवामानाचा कसलाही अंदाज जारी केलेला नाही.
ADVERTISEMENT











