Maharashtra Weather : राज्यातील भारतीय हवामान विभागानुसार 22 सप्टेंबर रोजी राज्यात मान्सून सक्रिय असणार आहे. तसेच असून, 20-22 सप्टेंबर दरम्यान हवामान विभागाने पावसाची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात विविध भागांमध्ये हवामान विभागाने मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच 14 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यापैकी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत पावसाचा जोर अधिक असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींची जीएसटी कराबाबत मोठी घोषणा, दैनंदिन वस्तूंवर 'एवढा' कर, तर हॉटेल्ससह इतर वस्तूंना...
कोकण विभाग :
कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांपैकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह पावसाची नोंद वर्तवली आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापुरात येथे हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर इतर ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस दाखल होईल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
मराठवाडा :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्याचा समावेश आहे. यापैकी छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हे ही वाचा : शिक्षकाने विद्यार्थिनीला घरी बोलावले, नंतर तिचा हात पकडत दीड महिन्यानंतर भयंकर... रत्नागिरीत खळबळ
विदर्भ :
विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश असेल. या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT
