पंतप्रधान नरेंद्र मोदींची जीएसटी कराबाबत मोठी घोषणा, दैनंदिन वस्तूंवर 'एवढा' कर, तर हॉटेल्ससह इतर वस्तूंना...
PM Narendra Modi On GST Tax : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता देशातील जनतेला बोलताना संबोधित केले. या वेळी त्यांनी जीएसटीत होणाऱ्या कराचा कपातीवर मोठं भाष्य केलं. या जीएसटीमध्ये तब्बल आठ वर्षांनी मोठी कपात होणार आहे. याचा फायदा हा देशातील लोकांना होणार असल्याचं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी जीएसटी कराबाबत मोठी घोषणा केली

नेमक्या कोणत्या वस्तूंवर किती कर लागणार?

नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलं संबोधित
PM Narendra Modi On GST Tax : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता देशातील जनतेला बोलताना संबोधित केले. या वेळी त्यांनी जीएसटीत होणाऱ्या कराच्या कपातीवर मोठं भाष्य केलं. या जीएसटीमध्ये तब्बल आठ वर्षांनी मोठी कपात होणार आहे. याचा फायदा हा देशातील लोकांना होणार असल्याचं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केलं.
हे ही वाचा : बायको मद्यधुंद होत विवस्त्रच पोहोचली पोलीस ठाण्यात, अधिकाऱ्यांसमोर अंगावरील झाकलेली चादर काढली नंतर पोलिसांनीच...
'वन नेशन वन टेक्सचं स्वप्न साकार झालं'
संबोधित करताना ते म्हणाले की, यापूर्वी अनेक कर लढण्यात आले होते, ते कर सर्वसामान्य गोरगरीब जनतेलाच भरावे लागत होते. त्यानंतर 2014 ला आपणच आम्हाला संधी दिल्यानंतर आम्ही जीएसटीला प्राथमिकता दिली. आम्ही प्रत्येक राज्याच्या शंकेचं निरसन केलं. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रश्नांची उत्तरं शोधून काढली. प्रत्येक राज्याला सोबत घेऊन आझाद भारत टॅक्स रिफॉर्म अंमलात आणली. सर्व टॅक्समध्ये अडकलेल्या लोकांना यातून बाहेर काढले. त्यामुळे वन नेशन वन टेक्सचं स्वप्न साकार झालं.
'5 % आणि 18 % या वस्तूंवर कर लागू होणार'
सध्याची वर्तमान परिस्थिती पाहता, तसेच देशाचे भविष्य पाहता जीएसटीचे नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. ज्यात जीएसटी ही केवळ 5 % आणि 18 % लागू होईल. यामध्ये प्रामुख्याने दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूंना कर भरावा लागणार नाही किंवा 5 % कर भरावा लागेल असे नरेंद्र मोदींनी सांगितलं.
यानंतर त्यांनी बोलताना सांगितलं की, सरकारने 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांचाही कर माफ केला होता. यामुळेच मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात चांगलाच बदल घडलेला दिसून येतोय. आता गोरगरीबांनाही चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. आताच्या या निर्णयाने गोरगरीब देशातील जनतेचंही भलं होणार असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले,