Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी मान्सून दाखल झाला असला तरीही उष्णता कायम असल्याचे दिसून येते. जून महिन्याच्या सुरूवातीला पावसाची परिस्थिती अपेक्षित होती, मात्र तसं दिसून येत नाही. काही ठिकाणीच ढगाळ वातावरण जाणवतंय. कोकणातील पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे, तर दुपारी हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच 9 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सोलापूर: पुतण्याने काकाला परस्त्री सोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, काकानं मुलासोबत...
कोकण
कोकणातील पालघर या जिल्ह्यात दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता जारी करण्यात आली आहे. तसेच सकाळी उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, मुंबई आणि रायगड या 3 जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवला. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वाऱ्यासह वादळाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या दोन जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच जळगावात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर या जिल्ह्याला विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट वर्तवला आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या 3 जिल्ह्यांना हलका ते मध्यम पाऊस आणि सोसायट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. तसेच अकोल्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
हे ही वाचा : बीड: गुंगीचे औषध देत तरुणीला लॉजवर नेलं, नंतर ब्लॅकमेल करत 'तसले' फोटो व्हिडिओ...
विदर्भ
विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली या 3 जिल्ह्यांना कोणताही अलर्ट जारी केलेला नाही. यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











