Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी आंशिक ढगाळ वातावरण असल्याची शक्यता आहे. तसेच प्रमुख शहरांमध्ये दिवसाचे तापमान हे 28 ते 32 डिग्री सेल्सिअस असल्याची शक्यता आहे. तर किनारपट्टी भागात 20 डिग्री अंश सेल्सिअस आणि अंतर्गत भागातील तापमान हे 10 अंश सेल्सिअसपर्यंत येण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुण्यात भीषण अपघात, ई-बसने गर्भवती महिलेला दिली धडक, तर 9 वर्षीय सख्ख्या बहिणीचा दुर्दैवी अंत
कोकण विभाग :
कोकण विभागात मुख्यत्वे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि मुंबई यांचा समावेश होतो. या पैकी मुंबईतही थंडी वाढली असून किमान तापमान 16 अंश सेल्सियसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. तसेच या विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हवामान कोरडं राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्र विभागात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. या विभागातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांच्या संताप अन् ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून तोडफोड
मराठवाडा आणि विदर्भ विभाग :
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने थंडीचा अलर्ट जारी केला आहे. तर विदर्भातील गोंदिय जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे.
ADVERTISEMENT











