Maharashtra Weather : हवामान विभागाने राज्यातील हवामानाच्या अंदाजाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. राज्यातील हवामानाचा अंदाज लक्षात घेता 19 जुलै रोजी राज्यातील मान्सूनची परिस्थिती कशी असेल याबाबतची हवामान विभागाने शक्यता वर्तवली. राज्यातील जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान, मान्सून सक्रिय असतो. हा मान्सून विशेषकरून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात असणार असल्याचा हवमान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल, 'कारण आलं समोर, नेमकं घडलं काय?
कोकण :
कोकणासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यापूर्वी मे 2025 मध्ये या भागांना हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला होता. तर जुलैमध्ये मान्सूनचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता अपेक्षित असणार आहे. मध्य महाराष्ट्रातील मुख्यत्वे पुणे आणि सातारा येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने यापूर्वी या भागांना अवकाळी पावसाचा इशारा दिला होता, तर 19 जुलै रोजी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठवाडा आणि विदर्भ :
मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनच्या स्थितीचा विचार केल्यास हलका ते मध्यम स्वरुपाचा मान्सून कोसळणार आहे. अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली यांसारख्या जिल्ह्यांमध्ये मान्सूनची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
हेही वाचा : बारामतीत बँक मॅनेजरने गळफास लावून बँकेतच केली आत्महत्या, सुसाईड नोटमधून धक्कादायक कारण आलं समोर
खानदेश :
खानदेशात पावसाचा जोर हा कमी असण्याची शक्यता आहे. जून महिन्यात मान्सूनचं प्रमाण हे कमी होतं. परंतु जुलै महिन्याच्या मध्यात पावसाची स्थिती चांगली सुधारेल. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि समुद्रकिनारी न जाण्याचा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
