Maharashtra Weather : राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होताना दिसतोय. काही भागांमध्ये उष्णतेत तीव्रता जाणावर असून काही ठिकाणी भागांमध्ये पावसाची अधिक शक्यता निर्माण होण्याची शक्यता होती. भारतीय हवामान विभागाने ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अकोला आणि अमरावती या सहा जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच 16 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : वडील बाहेर गेले, चुलत भावाला पोत्यात काहीतरी दिसलं, अन्... भयंकर कांड उघडकीस
कोकण
कोकण विभागात हवामान हे उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना दिवसभर उन्हाचा चटका सोसावा लागणार आहे. तसेच समुद्रकिनारी भङागात आर्द्रतेच्या प्रमाणात वाढ झाल्याने उकाड्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना उष्ण-दमट हवामान कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवली.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांतील वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची अधिक शक्यता आहे. तसेच हवामान विभागाने या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागातील लातूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यात देखील मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरींचा पाऊस धिंगाणा घालण्याची दाट शक्यता आहे.
हे ही वाचा : प्रेमसंबंधातून नवऱ्याने बायकोच्या प्रियकराचा कान चावून तोडला, दात तोडून जागेवर संपवलं
विदर्भ
विदर्भातील अकोला आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना उन्हाचा चटका अधिक तीव्र राहण्याची शक्यता आहे. तसेच दुपारच्या वेळी नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. दुपारच्या वेळी उन्हाचा पारा अधिक चढणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
ADVERTISEMENT











