Government Jobs : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोको पायलट पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 11,127 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी अर्जाची प्रक्रिया 15 मे पासून सुरु होणार आहे. यासाठी नेमका अर्ज कसा करायचा, पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
पात्रतेचे निकष
शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाले तर, दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडे नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय (ITI) असणे आवश्यक आहे. यामध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मेकॅनिक डिझेल, टर्नर, मशिनिस्ट यांसारख्या विविध ट्रेडचा समावेश आहे. याशिवाय, ज्या उमेदवारांनी दहावीनंतर संबंधित ट्रेडमध्ये 'ॲक्ट अप्रेंटिसशिप' पूर्ण केली आहे, ते देखील या भरतीसाठी पात्र मानले जातील.
हे ही वाचा : पुणे : ब्युटीशियनला प्रियकराने गाडीतच संपवलं, गोरखनाथने आफरीनचा काटा काढला
इतका पगार मिळणार
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार 'लेव्हल-२' चे वेतनमान मिळणार असून, सुरुवातीचे मूळ वेतन 19,900 रुपये इतके असेल. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून उमेदवारांनी संबंधित रेल्वे भरती मंडळाच्या (RRB) अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज भरायचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 14 जून निश्चित करण्यात आली असून, परीक्षा शुल्क भरण्यासाठी 16 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
हे ही वाचा : ड्रायव्हर आणि कंडक्टरने तिला बसमध्ये ओढले अन् नको तेच.. लाज आणणारी घटना
डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी
ज्या उमेदवारांकडे आयटीआय नाही, त्यांच्यासाठी पदविका (Diploma) आणि पदवी (Degree) हे पर्याय देखील उपलब्ध आहेत. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगमधील 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. यासंबंधी अधिक माहितीसाठी संकेतस्थळला (rrbapply.gov.in) भेट द्यावी. उच्च तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी रेल्वे प्रशासनात अधिकारी होण्यासाठी ही एक उत्तम संधी असून, इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT











