Govt Jobs : 'हे' एक प्रमाणपत्र असेल तर SBI मध्ये नोकरीची संधी, 60 हजारांहून अधिक पगार मिळणार

SBI मध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) अंतर्गत 'ट्रेड फायनान्स ऑफिसर' (MMGS-II) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 100 रिक्त जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे.

SBI Recruitment 2026

SBI Recruitment 2026

मुंबई तक

• 04:47 PM • 13 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : 'हे' एक प्रमाणपत्र असेल तर SBI मध्ये नोकरीची संधी,

point

60 हजारांहून अधिक पगार मिळणार

SBI Recruitment 2026 : भारतीय स्टेट बँकेत (SBI) स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) अंतर्गत 'ट्रेड फायनान्स ऑफिसर' (MMGS-II) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 100 रिक्त जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जात असून, या नियुक्त्या नियमित तत्त्वावर केल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून 13 मे पासून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज भरण्याची आणि शुल्क भरण्याची अंतिम मुदत 2 जूनपर्यंत आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मोजण्यासाठी 30 एप्रिल ही 'कट-ऑफ' तारीख निश्चित करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

'हे' प्रमाणपत्र अनिवार्य

या पदासाठी शैक्षणिक पात्रतेमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि आयआयबीएफ (IIBF) कडून विदेशी मुद्रा व्यवहार (Forex Operations) प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, उमेदवाराकडे कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँकेत 'ट्रेड फायनान्स' प्रक्रियेमध्ये पर्यवेक्षक किंवा अधिकारी म्हणून किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांकडे 'सीडीसीएस' (CDCS) किंवा आंतरराष्ट्रीय बँकिंग क्षेत्रातील विशेष प्रमाणपत्रे आहेत, त्यांना निवडीमध्ये प्राधान्य दिले जाईल. तसेच, उमेदवाराचे संवाद कौशल्य आणि सादरीकरण कौशल्य उत्कृष्ट असणे अपेक्षित आहे.

हे ही वाचा : अमरावती : मोबाईल दुकानदाराच्या बायकोने नादी लावलं, 64 वर्षीय शेतकऱ्याचे 70 लाख गेले

शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत

वयोमर्यादेचा विचार करता, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय 23 ते 32 वर्षांच्या दरम्यान असावे. नियमांनुसार, ओबीसी (नॉन-क्रीमी लेअर) प्रवर्गासाठी 3 वर्षे आणि अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) प्रवर्गासाठी 5 वर्षांची सवलत देण्यात आली आहे. अर्जासाठी सर्वसाधारण, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गाला 750 रुपये शुल्क भरावे लागेल, तर अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. उमेदवारांची निवड केवळ शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे केली जाणार असून, लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. शैक्षणिक गुणवत्ता, योग्यता आणि अनुभव यांच्या आधारे उमेदवारांचे शॉर्ट लिस्टिंग केले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना 60 हजारांहून अधिक रुपये इतका पगार दिला जाणार आहे.

हे ही वाचा : नवऱ्याला कळलं बायकोचं 'ते' गुपित, दोन प्रियकरांच्या मदतीने थेट शेवटच केला

मुलाखतीची तारीख काय?

इच्छुक उमेदवारांनी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर (sbi.co.in) जाऊन ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. मुलाखतीचे कॉल लेटर केवळ ईमेलद्वारे किंवा बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल, त्याची कोणतीही हार्ड कॉपी पाठवली जाणार नाही. मुलाखतीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून ती लवकरच वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. ट्रेड फायनान्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या अनुभवी बँकिंग व्यावसायिकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.