नवऱ्याला कळलं बायकोचं 'ते' गुपित, दोन प्रियकरांच्या मदतीने थेट शेवटच केला

मुंबई तक

एका महिलेने आपल्या दोन प्रियकरांच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली आहे. पोलीस तपासात यामागील धक्कादायक कारण समोर आले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याला कळलं बायकोचं 'ते' गुपित

point

दोन प्रियकरांच्या मदतीने थेट शेवटच केला

Crime News : एका महिलेने आपल्या दोन प्रियकरांच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी मृताची पत्नी गणिता देवी आणि तिचे दोन प्रियकर रंजीत कुमार राय व सुमन कुमार यांना अटक केली आहे. 5 मे रोजी गणिता देवीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन पती गजेंद्र मंडल बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती, मात्र तपासाअंती तीच या हत्येची मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील ही घटना आहे.

बायकोचे दोघांशी प्रेमसंबंध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय गजेंद्र मंडलचा मृतदेह 7 मे रोजी वरुणेश्वर कालव्याजवळ झाडीत आढळून आला होता. एसडीपीओ शैलेश प्रीतम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सखोल तपासानंतर मृताच्या पत्नीचे रंजीत आणि सुमन या दोघांशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. 2 मे रोजी गजेंद्रला पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने त्यांच्यात भांडण झाले होते, ज्याचा राग मनात धरून दोन्ही प्रियकरांनी गजेंद्रला जेवण्याच्या बहाण्याने कालव्यापाशी नेले आणि पत्नीच्या साथीने त्याची हत्या केली.

हे ही वाचा : 'तुझी बहीण जिवंत जाणार नाही..' लग्नानंतर चारच दिवसांत सासूची धमकी, भाऊ पोहोचेपर्यंत...

नवरा बेपत्ता असल्याचा बनाव

गुन्ह्याचा तपास भरकटवण्यासाठी गणिता देवीने पती बेपत्ता असल्याचे नाटक रचले होते. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी या कारवाईत आरोपींकडून तीन मोबाईल फोन आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. जानकीनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि इतर अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून सध्या तिन्ही आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

हे ही वाचा : निदा खानला आश्रय देणं महागात, नगरसेवक मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर कारवाई, नेमकं काय घडलं?

आरोपींची रवानगी तुरुंगात

या घटनेमुळे नातेसंबंधांमधील ताणतणाव आणि अनैतिक संबंधांची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली आहे. पोलिसांनी सांगितले की, मृताची पत्नी गणिता देवी आणि तिचे दोन्ही प्रियकर रंजीत कुमार राय आणि सुमन कुमार यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. 
 

हे वाचलं का?