डोंबिवलीतील तरुण मित्रांसोबत इर्शाळवाडी ट्रेकला गेला, पण घरी डेथ बॉडी परतली, काय घडलं?
Dombivli News : डोंबिवलीतील 20 वर्षीय तरुण रितेश कोणका याचा इर्शाळवाडी ट्रेकदरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला असून, उष्माघात किंवा हृदयविकाराचा झटका हे प्राथमिक कारण असल्याचा अंदाज आहे. मात्र, पोस्टमॉर्टेम नंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डोंबिवलीतील तरुण मित्रांसोबत इर्शाळवाडी ट्रेकला गेला
पण घरी डेथ बॉडी परतली, काय घडलं?
Dombivli News :डोंबिवलीतील एका तरुणाचा इर्शाळवाडी ट्रेक दरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. डोंबिवली येथील 20 वर्षीय रितेश कोणका हा तरुण आपल्या पाच मित्रांसोबत खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध इर्शाळवाडी गडावर ट्रेकिंगसाठी गेला होता. निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटण्यासाठी गेलेल्या या तरुणाचा ट्रेक सुरू असतानाच अचानक मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे रितेशच्या मित्रपरिवारासह संपूर्ण डोंबिवली परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून, एका उमद्या तरुणाचा असा अचानक जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
ट्रेकदरम्यान प्रकृती बिघडली; ग्रामस्थांच्या मदतीने झोळीतून आणले
सोमवारी डोंबिवलीतील सहा मित्रांचा ग्रुप ट्रेकिंगच्या उद्देशाने इर्शाळवाडी येथे पोहोचला होता. यामध्ये साहिल सुर्वे, युवराज चव्हाण, मितेश गुप्ता, देवेश गुप्ता, क्रिश शेट्टी आणि रितेश कोणका यांचा समावेश होता. ट्रेक चढत असताना अचानक रितेशला अस्वस्थ वाटू लागले आणि त्याची प्रकृती खालावली. त्याच्या मित्रांनी त्याला पाणी देऊन सावरण्याचा आणि धीर देण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच तो बेशुद्ध पडला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन मित्रांनी तातडीने पायथ्याला धाव घेतली आणि स्थानिक ग्रामस्थांना मदतीसाठी बोलावले. दुर्गम भाग असल्याने ग्रामस्थांनी मोठ्या कष्टाने पारंपारिक झोळी तयार करून रितेशला डोंगरावरून खाली आणले, मात्र दुर्दैवाने डोंगरावरून खाली येण्यापूर्वीच त्याचा श्वास थांबला होता.
हेही वाचा : सासरच्यांनी केला जीन्स घालायला विरोध, शेवटी सुनेनं केलं नको ते
उष्माघात की हृदयविकाराचा झटका? शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष
रितेशच्या अचानक झालेल्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार कडाक्याची उष्णता किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे ही घटना घडली असावी असे बोलले जात आहे. वाढत्या तापमानामुळे ट्रेकिंगसारख्या शारीरिक श्रमाच्या कामात उष्माघाताचा धोका संभवतो, असा प्राथमिक तर्क वर्तवण्यात आला आहे. तरीही, मृत्यूचे नेमके आणि अधिकृत कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच समोर येईल. पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी या संदर्भात अधिक तपास करत असून रितेशच्या निधनाने त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे.









