Baramati Plane Crash : बारामतीत पुन्हा कोसळले विमान, गोजुबावी परिसरात मोठी खळबळ
बारामती तालुक्यातून पुन्हा एकदा विमान अपघाताची धक्कादायक बातमी समोर येत आहे. तालुक्यातील गोजुबावी गावच्या हद्दीत 'रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी'चे एक शिकाऊ विमान कोसळले असून, ही घटना आज (13 मे) सकाळी घडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बारामतीत पुन्हा कोसळले विमान
गोजुबावी परिसरात मोठी खळबळ
Baramati Plane Crash : बारामती तालुक्यातून पुन्हा एकदा विमान अपघाताची धक्कादायक बातमी समोर येत आहे. तालुक्यातील गोजुबावी गावच्या हद्दीत 'रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी'चे एक शिकाऊ विमान कोसळले असून, ही घटना आज (13 मे) सकाळी घडली.
प्रशिक्षण सुरु असतानाच अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षण सुरू असताना अचानक विमानाला हा अपघात झाला. गोजुबावी येथील ज्या परिसरात हे विमान कोसळले, त्याच भागात काही काळापूर्वी अजित पवार यांच्या विमानालाही अपघात झाला होता. त्यामुळे हा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या विमानाचा वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे.
हे ही वाचा : निदा खानला आश्रय देणं महागात, नगरसेवक मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर कारवाई, नेमकं काय घडलं?
रेडबर्ड या संस्थेवर बंदी
बारामतीमध्ये 'कारवार एव्हिएशन' आणि 'रेडबर्ड' या दोन संस्थांमार्फत वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. काही काळापूर्वी रेडबर्ड या संस्थेवर बंदी घालण्यात आली होती. यापूर्वी देखील रेडबर्ड या कंपनीची विमाने या ठिकाणी कोसळलेली आहेत. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या सुरक्षेचा आणि विमानांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हे ही वाचा : सासरच्यांनी केला जीन्स घालायला विरोध, सुनेनं केलं नको ते
अपघाताचं कारण अस्पष्ट
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून, प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. अद्याप अपघाताचं कारण अस्पष्ट आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.









