सांगलीत चाललंय तरी काय? 15 दिवसात 3 खून, वायरमनसह कोणा-काणाची झाली हत्या?
Sangli Crime News : जत तालुक्यात गेल्या 15 दिवसात तिसरा खून झाल्याने खळबळ उडाली असून भिवरगी येथे चुलत भावानेच तरुणाचा गळा दाबून खून केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सांगलीत चाललंय तरी काय?
15 दिवसात 3 खून, वायरमनसह कोणा-काणाची झाली हत्या?
Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात खुनाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. गेल्या पंधरा दिवसांत तालुक्यात लागोपाठ तीन खुनाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे प्रचंड सावट निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी कोसारी येथे दादासो यमगर यांचा अपहरण-खून झाला होता. त्यानंतर संख येथे महावितरणचे वायरमन संतोषकुमार बिरादार यांचा मध्यरात्री गोळ्या झाडून संपवण्यात आलं होतं. आता भिवरगी येथे एका तरुणाचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून चुलत भावानेच भावाचा जीव घेतल्याची ही धक्कादायक घटना घडली असून, या घटनेचा 'लाईव्ह' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. उमदी पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सिलसिद्ध बिरादार याला तत्काळ अटक केली आहे.
दारूच्या नशेत चेष्टा-मस्करी ठरली जीवघेणी
भिवरगी-करजगी रोडवरील गौडर वस्ती येथे सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. महादेव सिद्धू बिरादार (वय 26, व्यवसाय शेती) आणि त्याचा चुलत भाऊ सिलसिद्ध मलाप्पा बिरादार (वय 27) हे दोघे एकत्र असताना त्यांच्यात दारूच्या नशेतून चेष्टा-मस्करी सुरू होती. मात्र, ही मस्करी काही वेळातच गंभीर वादात बदलली. सुरुवातीला शाब्दिक असलेला हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोघांमध्ये जोरदार झटापट सुरू झाली आणि रागाच्या भरात सिलसिद्धने महादेववर हल्ला केला. यावेळी उपस्थितांमध्ये आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ही थरारक घटना कैद झाली आहे, ज्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
गळा दाबून चुलत भावाचा केला खून
दोघांमध्ये सुरू असलेल्या या मारामारीत सिलसिद्ध बिरादार याने महादेवचा गळा हाताने जोरात दाबून धरला. प्रत्यक्षदर्शी आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे एकमेकांच्या अंगावर बसून मारामारी करत होते, तेव्हा सिलसिद्धने महादेवचा गळा तो हालचाल करेनासा होईपर्यंत सोडला नाही. महादेव बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी धाव घेऊन त्याला तत्काळ जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केले. या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाल्याने पोलिसांना तपासात मोठा पुरावा मिळाला असून, आरोपीचे नावही निष्पन्न झाले आहे. प्राथमिक तपासात गळा दाबूनच खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
परिसरात भीतीचे सावट आणि कुटुंबावर कोसळला शोककळा









