कल्याण : भोंदूबाबाने आईला बाहेर पाठवलं, अन् मुलीला तोकड्या कपड्यात बसवून...
Kalyan Crime : कल्याणमध्ये पूजेच्या बहाण्याने घरात शिरून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 78 वर्षीय भोंदूबाबाला खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्र हादरला, पूजेच्या बहाण्याने 15 वर्षीय मुलीवर अत्याचार
78 वर्षीय शाहिद शेख अटकेत
Kalyan Crime : कल्याण शहरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. घरात सुख-शांती आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी पूजा करण्याच्या बहाण्याने एका 78 वर्षीय भोंदूबाबाने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कल्याणमधील खडकपाडा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत शाहिद शेख नावाच्या भोंदूबाबाला अटक केली आहे. आरोपी हा उल्हासनगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून, त्याने श्रद्धेचा गैरफायदा घेत एका निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
हेही वाचा : सौंदर्यवतीच्या लग्नात पालकांकडून 28 लाखांचा खर्च, पण 2 महिन्यात बॉडी आली
विश्वासघात; पूजेच्या नावाखाली अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शाहिद शेख हा 2 मे रोजी पीडित मुलीच्या आईच्या संपर्कात आला होता. त्याने कुटुंबाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी घरात विशेष शांती पूजेची गरज असल्याचे भासून त्यांचा विश्वास संपादन केला. 2 मे रोजी तो पूजेसाठी पीडितेच्या घरी आला आणि तिथे त्याने थातूरमातूर विधी करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याने 15 वर्षीय मुलीला तोकड्या कपड्यांमध्ये समोर बसण्यास भाग पाडले आणि तिच्याशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पीडित मुलगी प्रचंड हादरली आणि भीतीपोटी तिने त्यावेळी कोणाकडेही वाच्यता केली नाही. याच भीतीचा गैरफायदा घेत नराधम शाहिद शेख पुन्हा 6 मे रोजी तिच्या घरी पोहोचला.
हेही वाचा : सौंदर्यवतीच्या लग्नात पालकांकडून 28 लाखांचा खर्च, पण 2 महिन्यात बॉडी आली
नराधमाच्या कृत्याचा मुलीने केला उलगडा; खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6 मे रोजी पूजेच्या नावाखाली पुन्हा घरात शिरलेल्या या भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. आरोपी घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर पीडित मुलीने मोठ्या धैर्याने आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीचा हा आपबिती ऐकताच आईने विलंब न लावता मुलीसह खडकपाडा पोलीस ठाणे गाठले आणि शाहिद शेख विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल केला आणि आरोपीचा शोध सुरू केला. 78 वर्षांच्या या आरोपीने केलेल्या या घृणास्पद कृत्यामुळे पोलीस प्रशासनही चक्रावून गेले असून, अशा प्रवृत्तींना समाजात स्थान मिळू नये अशी मागणी होत आहे.
आरोपीला पोलीस कोठडी; खडकपाडा पोलिसांकडून सखोल तपास सुरू









