Maharashtra Weather : राज्यानं पारा गाठला, वातावरणानं पहिल्यांदा लेव्हल केली पार, 12 जिल्ह्यांचं खरं नाही
Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा पारा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. भारतीय हवामान विभागाने 13 मे 2026 रोजी 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, जाणून घेऊयात नेमके कोणते जिल्हे आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात उष्णतेचा पारा हा दिवसेंदिवस वाढतो
'या' जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट
Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा पारा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. भारतीय हवामान विभागाने 13 मे 2026 रोजी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, परभणी, अकोला, अमरावती आणि बीड या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच राज्यातील बहुतांश ठिकाणी आकाश हे निरभ्र राहणार असून दुपारी उष्णतेचा अधिकचा प्रभाव जाणवेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज.
हे ही वाचा : महाराष्ट्र हादरला, सरकारी अधिकाऱ्यासमोर RTI कार्यकर्त्याची हत्या, नेमकं प्रकरण काय?
कोकण
कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्ग परिसरात उकाडा दमट राहील अशी शक्यता आहे. तसेच कोकण किनारपट्टाच्या भागात आर्द्रतेमुळे उष्णतेत अधिकचा त्रास जाणवू लागतो असा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तापमानात अधिकची वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील तापमान हे 42 ते 43 अंशांच्या असपास राहण्याची शक्यता आहे. तसेच दुपारच्या वेळेत उन्हाचा अधिकचा चटका जाणवण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये हवामान उष्ण राहणार आहे. या जिल्ह्यांमध्ये दुपारी कोरडं आणि उष्ण वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला.









