सांगली : मंदिराची भिंत कोसळून 6 भाविकांचा दुर्दैवी अंत, यात्रेच्या उत्सवावर विरजण

मुंबई तक

Sangli News : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी एक भीषण दुर्घटना घडली आहे. गावातील मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. 12 मे 2026 रोजी मंगळवारी सायंकाळी अचानक आलेल्या तुफान वादळी वाऱ्याने बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळली.

ADVERTISEMENT

Sangli News
Sangli News
google news

बातम्या हायलाइट

point

जत तालुक्यातील मोटेवाडीत मंदिराची भिंत कोसळली

point

मृतांचा आकडा आला समोर 

Sangli News : स्वाती चिखलीकर - सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी एक भीषण दुर्घटना घडली आहे. गावातील मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. 12 मे 2026 रोजी मंगळवारी सायंकाळी अचानक आलेल्या तुफान वादळी वाऱ्याने बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळली. या दुर्घटनेत 6 भाविकांचा मृत्यू झाला, तर 20 ते 25 जण गंभीरपणे जखमी झाल्याची माहिती समोर आली. 

हे ही वाचा : महाराष्ट्र हादरला, सरकारी अधिकाऱ्यासमोर RTI कार्यकर्त्याची हत्या, नेमकं प्रकरण काय?

मंदिराची भिंत कोसळून भाविकांचा मृत्यू 

संबंधित प्रकरणाची अधिकची माहिती अशी समोर आली, मुरगुबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोटेवाडीतील मंदिरात मोठी गर्दी केली होती. दरम्यान निसर्ग कोपल्याने परिसरात वादळी वारा सुरु झाला आणि या दुर्घटनेत मंदिराची भिंत कोसळली. भिंतीच्या खाली काही भाविक होते, याचदरम्यान शेजारील एक पत्र्याचे शेड थेट भिंतीवर कोसळले आणि भिंतीच कोसळली. या दुर्घटनेत भाविक भिंतीखाली दबले गेले. दरम्यान स्थानिकांनी आणि ग्रामस्थांनी तत्काळपणे मदतकार्य सुरु करून अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात यश मिळवले. 

हे ही वाचा : नवऱ्याला दारू आणायला पाठवलं, व्यक्तीनं पीडितेवर घरात साधला डाव

मृतांचा आकडा आला समोर 

या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये काही मुलांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींवर संख आणि जत येथील  ग्रामीण रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून प्रशासन, पोलिस आणि महसूल विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे.

हे वाचलं का?