मुंबईची खबर : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 15 मे पासून पाणीकपात, BMC नं काय सांगितलं?
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 15 मे पासून मुंबईकरांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांतील पाणी घटत चालल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!
15 मे पासून पाणीकपात,
BMC नं काय सांगितलं?
Mumbai Water cut : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 15 मे पासून मुंबईकरांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात करण्यात येणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांतील पाणी घटत चालल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. तसेच सर्व नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. बीएमसीने केलेल्या एक्स या सोशल मीडिया हँडलवर याविषयी पोस्ट केली आहे. यामध्ये नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया.
बीएमसीने नेमके काय आवाहन केले आहे?
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा पाणीसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय तसेच भारतीय हवामान खात्याने पुढील वर्षी येणाऱ्या अल निनो व आयओडी बाबत वर्तवलेला अंदाजानुसार कमी मान्सून प्रमाण लक्षात घेता जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार मुंबई महानगरात शुक्रवार, दिनांक १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे विनम्र आवाहन देखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
हे ही वाचा : Govt Jobs : 12 वी पास उमेदवारांसाठी खुशखबर, मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज
दिनांक ११ मे २०२६ रोजीची आकडेवारी लक्षात घेता, मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण ३ लाख ४० हजार ३९९ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत सध्या २३.५२ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासनाचे अत्यंत बारकाईने लक्ष असून दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे.
एवढेच नव्हे तर, भातसा धरणातील निभावणी साठ्यातून १,४७,०९२ दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातील निभावणी साठ्यातून ९०,००० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. याचाच अर्थ मुंबईसाठी पाणीसाठा उपलब्ध असून मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.









