Maharashtra Weather : दुपारी आणि संध्याकाळी घरीच थांबा, अर्ध्या राज्याला फुटणार घाम तर कुठे पाऊस; IMD चा अलर्ट
Maharashtra Weather : राज्यात मे महिन्यात हवामानात मोठा बदल जाणवत आहे. उष्णतेच्या लाटेसह वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचं संकट उभं ठाकलं आहे. 11 मे रोजी देखील कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा असेल. तसेच 13 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात मे महिन्यात हवामानात मोठा बदल
उष्णतेच्या लाटेसह वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचं संकट
Maharashtra Weather : राज्यात मे महिन्यात हवामानात मोठा बदल जाणवत आहे. उष्णतेच्या लाटेसह वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचं संकट उभं ठाकलं आहे. 11 मे रोजी देखील कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा असेल. तसेच 13 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. सोमवारी 11 मे 2025 रोजी राज्याचे एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
हे ही वाचा : अमरावती : सेल्फीचा नाद बेकार, दोन सख्ख्या भावंडांसह तलावात बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू
कोकण
कोकणात उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होणार आहे. अशातच अनेकदा अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सायंकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रात पुढील 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर परिसरात सोसायट्यांचा वारा, विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज जारी करण्यात आला.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडं राहणार असून कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा इशारा जारी करण्यात आला नाही. अहिल्यानगरात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच दुपारी उष्णतेची अधिक तीव्रता जाणवणार आहे.









