अमरावती : सेल्फीचा नाद बेकार, दोन सख्ख्या भावंडांसह तलावात बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई तक

Amravati News : अमरावती शहरात मन सून्न करून टाकणारी घटना घडली आहे. सेल्फीचा आणि फोटोशूटच्या नादात चार जणांचा बळी गेला आहे. माडी रोडवरील घो़डे मेडिकल कॉलेजजवळ असलेल्या एका तलावात चौघांचा बुडून मृत्यू झाला. यात दोन सख्ख्या भावंडांसह इतर दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Amravati News
Amravati News
google news

बातम्या हायलाइट

point

अमरावती शहरात मन सून्न करून टाकणारी घटना

point

सेल्फी काढण्यासाठी गेले आणि चौघांचा तलावात बुडून मृत्यू 

Amravati News : धनंजय साबळे - अमरावती शहरात मन सून्न करून टाकणारी घटना घडली आहे. सेल्फीचा आणि फोटोशूटच्या नादात चार जणांचा बळी गेला आहे. माडी रोडवरील घो़डे मेडिकल कॉलेजजवळ असलेल्या एका तलावात चौघांचा बुडून मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकरणात एक किशोरवयीन भाऊ आदित्य नरेंद्र जोशी (वय 12) आणि बहीण सोनाली नरेंद्र जोशी (वय 16) या दोन सख्खा भावंडांचा दुर्दैवी अंत झाला. तसेच याच अपघातात पायल बबलू पंडित (वय 21) आणि यश काकणे (वय 13) या दोघांचाही जीव गेला आहे. हे सर्व मृत अमरावतीती खोलापुरी गेट परिसरातील रहिवासी आहेत. 

हे ही वाचा : पुणे : नवऱ्यासमोर बायकोची आठव्या मजल्यावरून उडी, थरकाप उडवणारा Video

सेल्फी काढण्यासाठी गेले आणि चौघांचा तलावात बुडून मृत्यू 

घडलेल्या घटनेनुसार, तलाव परिसरात तरुणांमध्ये सेल्फी काढण्यासाठी आणि फोटोशूट करण्यासाठी लोकप्रिय ठिकाण आहे. रविवारी चार मित्र हे तलावाच्या काठावर बसले होते; परंतु त्यातील कोणीही सुखरूप बाहेर येऊ शकले नाही, काही क्षणांमध्ये ते पाण्यात दिसू लागले नाहीत. परिसरातील रहिवाशांनी अपत्ती रुग्णालयात दाखल केले. अधिकृत बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी नागरिकांनी चौघांना पाण्यात बाहेर काढले, मात्र तोवर उशिर झाला होता. यात चौघांचा मृत्यू झाला. 

अपघातानंतर घटनास्थळी आक्रोश माजून रडण्याचा आवाज येत होता. मृताच्या कुटुंबातील सदस्यांनी दु:ख व्यक्त केले. परिसरात शोक व्यक्त करत संताप देखील उसळला होता. यानंतर नागरिकांनी पोलिसांना बोलावून कायदेशीर आणि प्रशासकीय पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनाम्याची कारवाई केली.

हे ही वाचा : वसई : हाण की बडीव! भर लग्नात सगळेच एकमेकांवर तुटून पडले, तुफान हाणामारीचा VIDEO

ही दुर्घटना सेल्फीमुळे झाली असून ही बाब धक्कादायक आहे. पाण्याजवळ अशा घटना घडू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडे सुरक्षेच्या उपाययोजनेची मागणी केली आहे. 

हे वाचलं का?