गर्लफ्रेंडच्या सौंदर्याची इतकी भूरळ पडली की, प्रेमात वेडा होऊन केलं भयंकर कृत्य!

मुंबई तक

Uttar Pradesh Crime News : एका व्यक्तीने प्रेमसंबंधांना विरोध करणाऱ्या आपल्या पत्नीची विष देऊन हत्या केली असून, पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

ADVERTISEMENT

Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

गर्लफ्रेंडच्या सौंदर्याची इतकी भूरळ पडली

point

प्रेमात वेडा होऊन केलं भयंकर कृत्य!

UP Crime News : उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात आंधळ्या झालेल्या एका पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना बीघापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबूखेडा गावात घडली असून, गंगादीन लोधी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गंगादीनचे गावातीलच एका विवाहित महिलेशी दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते, तिचा पती कामानिमित्त बाहेर राहत असे. जेव्हा गंगादीनची 40 वर्षीय पत्नी आरती हिला या अनैतिक संबंधांची माहिती मिळाली, तेव्हा तिने याला तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली. या विरोधातूनच त्यांच्यात सतत भांडणे होत होती आणि अखेर या वादाचा शेवट एका निष्पाप महिलेच्या मृत्यूने झाला आहे.

हेही वाचा : बहिणीने हिंदू मुलाशी लग्न केलं, शकील खानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, काय केलं?

गर्लफ्रेंडच्या प्रेमात वेडा होऊन बायकोचा जीव घेतला 

मिळालेल्या माहितीनुसार, गंगादीन आणि आरती यांना मूलबाळ नव्हते, ज्यामुळे त्यांच्यात आधीपासूनच काही प्रमाणात तणाव होता. त्यातच गंगादीनच्या बाहेरील प्रेमसंबंधांमुळे हा वाद अधिकच विकोपाला गेला. रविवारी उशिरा रात्री पुन्हा एकदा याच कारणावरून पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. आरतीच्या माहेरच्या लोकांनी आरोप केला आहे की, गंगादीनने संतापच्या भरात आरतीला आधी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर तिला बळजबरीने विषारी पदार्थ पाजले. गुन्हा केल्यानंतर आरोपी गंगादीन घटनास्थळावरून पसार झाला होता, मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत त्याला तात्काळ ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : 'आई मला खूप दुखतंय..' चिमुरडीसोबत 75 वर्षीय वकीलाने काय केले?

हे वाचलं का?