'आई मला खूप दुखतंय..' चिमुरडीसोबत 75 वर्षीय वकीलाने काय केले?
एका उच्चभ्रू वस्तीतून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 75 वर्षीय वकिलाने आपल्या शेजारी राहणाऱ्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आई मला खूप दुखतंय..
चिमुरडीसोबत 75 वर्षीय वकीलाने काय केले?
Crime News : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील एका उच्चभ्रू वस्तीतून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. हबीबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 75 वर्षीय वकिलाने आपल्या शेजारी राहणाऱ्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी संरक्षण दलातील अधिकाऱ्याची कन्या आहे. ही मुलगी आरोपीच्या नातीसोबत खेळण्यासाठी वारंवार त्यांच्या घरी जात असे. आरोपी आपल्या विवाहित मुलीसोबत आणि नातीसोबत राहत होता. आरोपीची नात त्याला 'आजोबा' म्हणत असे, त्यामुळे पीडित मुलगीही त्याला याच नावाने हाक मारत असे. 3 मे रोजी ही चिमुरडी नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी वकिलाच्या घरी गेली होती. खेळत असताना आरोपीने तिला एका बहाण्याने दुसऱ्या खोलीत बोलावले आणि तिथे तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य केले.
हे ही वाचा : सांगलीत चाललंय तरी काय? 15 दिवसात 3 खून, वायरमनसह कोणा-काणाची झाली हत्या?
'आजोबा'ला अटक
थोड्या वेळाने मुलगी घरी परतली आणि तिने आपल्या आईकडे खासगी भागात वेदना होत असल्याची तक्रार केली. पालकांनी तपासणी केली असता तिच्या शरीरावर ओरखड्यांच्या खुणा आढळून आल्या. तातडीने तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले, जिथे वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून कुटुंबीयांनी हबीबगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीचे समुपदेशन केले असता, तिने शेजारच्या आजोबांनी हे कृत्य केल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत 75 वर्षीय आरोपी वकिलाला अटक केली. न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे.
हे ही वाचा : शाळेतून घरी येताना 13 वर्षीय मुलीवर अत्याचार, पीडितेचे डोळे काढून उसाच्या शेतात आढळला मृतदेह
पालकांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अत्यंत सुरक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या वस्तीत अशा प्रकारची घटना घडल्याने मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, अशा गुन्ह्यांना थारा दिला जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. ही घटना समाजासाठी एक गंभीर इशारा असून, सुरक्षित वातावरणातही मुलांच्या बाबतीत सतर्क राहणे किती गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.









