नवऱ्याला दारू आणायला पाठवलं, व्यक्तीनं पीडितेवर घरात साधला डाव

मुंबई तक

crime news : आरोपीने महिलेच्या पतीला दारू आणायला सांगितली. घरात कोणीही नसल्याची संधी साधून पीडितेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर पीडितेनं कारवाई करत आरोपीची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

व्यक्तीने पीडितेच्या नवऱ्याला दारू आणण्यासाठी पाठवले अन्... 

point

आरोपीला तुरुंगवासाची शिक्षा

crime news : छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील कापू ठाणे परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपीने महिलेच्या पतीला दारू आणायला सांगितली. घरात कोणीही नसल्याची संधी साधून पीडितेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर पीडितेनं कारवाई करत आरोपीची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरण समजून घेतलं आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

हे ही वाचा :  पुरुष महिलेसोबत हॉटेलात, बायकोचे खोटे आधार कार्ड वापरून नको तेच..

व्यक्तीने पीडितेच्या नवऱ्याला दारू आणण्यासाठी पाठवले अन्... 

घडलेल्या घटनेनुसार, पोलिसांनी 10 मे 2026 रोजी महिलेने कापू ठाण्यात तक्रार दाखल केली. नंतर तिने सांगितले की, 23 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी, सुधीर किस्पोटा नावाची ओळखीची व्यक्ती पीडितेच्या घरी आली होती. त्याने पीडितेच्या नवऱ्याला दारू आणण्याच्या बहाण्याने दुसऱ्या गावात पाठवले. पती घरातून निघून गेल्यानंतर, आरोपी किस्पोटाने महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती कोणालाही न सांगण्याची माहिती दिली आणि तो घटनास्थळापासून पळून गेला. 

हे ही वाचा :  सौंदर्यवतीच्या लग्नात पालकांकडून 28 लाखांचा खर्च, पण 2 महिन्यात बॉडी आली

आरोपीला तुरुंगवासाची शिक्षा

सार्वजनिक बदनामीच्या भीतीने त्या महिलेने पोलिसांना या घटनेची माहिती दिली नव्हती. नंतर, पीडितेनं हिंमत एकवटून या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पीडितेच्या तक्रारीनंतर, कापू पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आरोपीला अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.   

हे वाचलं का?