Government Jobs : भारत सरकारच्या कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) स्टेनोग्राफर ग्रेड ‘सी’ (गट ब- अराजपत्रित) आणि स्टेनोग्राफर ग्रेड ‘डी’ (गट क) या पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे अंदाजे 731 रिक्त जागा भरल्या जाणार असून, भविष्यात या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 12 वी उत्तीर्ण असलेल्या आणि लघुलेखनाचे (Stenography) कौशल्य अवगत असलेल्या तरुण-तरुणींसाठी केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना 15 मे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
ADVERTISEMENT
'अशी' असेल प्रक्रिया
या भरतीसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून, 1 ऑगस्ट रोजी ग्रेड 'सी' पदासाठी 18 ते 30 वर्षे आणि ग्रेड 'डी' पदासाठी 18 ते 27 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रतेबद्दल सांगायचे तर, मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. निवडीच्या प्रक्रियेत संगणकावर आधारित परीक्षा (CBE) आणि त्यानंतर लघुलेखन कौशल्य चाचणी (Skill Test) घेतली जाईल, ज्यामध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
हे ही वाचा : “आग लगे बस्ती में, हम अपनी मस्ती में”, मोदींवर कोणाची टीका?
अर्जाचे शुल्क
अर्ज प्रक्रियेसाठी सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पुरुषांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग, माजी सैनिक आणि सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांना अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अर्जात काही दुरुस्ती करायची असल्यास 20 आणि 21 मे 2026 रोजी 'करेक्शन विंडो' उपलब्ध करून दिली जाईल. या भरतीची संभाव्य संगणकीय परीक्षा जुलै ते ऑगस्ट 2026 दरम्यान आयोजित केली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे उमेदवारांनी आतापासूनच तयारीला लागणे आवश्यक आहे.
हे ही वाचा : NCP च्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल अन् सुनील तटकरेंना डच्चू? पत्र व्हायरल होताच सुनेत्रा पवारांची पोस्ट
'इतका पगार मिळणार
निवड झालेल्या उमेदवारांना अत्यंत आकर्षक वेतन श्रेणी आणि इतर लाभ दिले जाणार आहेत. ग्रेड 'सी' पदासाठी वेतन स्तर-7 नुसार अंदाजे 10 ते 12 लाख रुपये वार्षिक (CTC) वेतन मिळेल, तर ग्रेड 'डी' पदासाठी वेतन स्तर-4 नुसार 6 ते 8 लाख रुपये वार्षिक वेतन मिळू शकते. याव्यतिरिक्त महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), वैद्यकीय सुविधा, पेन्शन आणि रजा रोखीकरण यांसारखे केंद्र सरकारचे सर्व लाभ कर्मचाऱ्यांना लागू होतील. अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्जासाठी उमेदवारांनी 'www.ssc.gov.in' या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
ADVERTISEMENT











