“आग लगे बस्ती में, हम अपनी मस्ती में”, मोदींवर कोणाची टीका?

मुंबई तक

Raju Shetti on Narendra Modi : माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. एकीकडे पीएम मोदी इंधन बचत कमी करण्यासाठी जनतेला आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या उपस्थित गुजरातमध्ये एअर शो आयोजित करण्यात आला होता, असं शेट्टींनी नमूद केलंय.

ADVERTISEMENT

PM MODI
PM MODI
google news

बातम्या हायलाइट

point

“आग लगे बस्ती में, हम अपनी मस्ती में”

point

मोदींवर कोणाची टीका?

Raju Shetti on Narendra Modi : मिडल ईस्टमधील वाढता तणाव आणि जागतिक आर्थिक संकट पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. "घरात लग्नकार्य असो किंवा इतर कोणताही समारंभ, शक्य असल्यास सोने खरेदीची योजना एका वर्षासाठी पुढे ढकलावी.  नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा. इंधनाची बचत हीच देशाची मोठी मदत ठरेल. वर्कफ्रॉम करुन इंधनाची बचत करावी" असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 3 दिवसांत वारंवार केलं. दरम्यान, पीएम मोदींनी हे आवाहन केल्यानंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. माजी खासदार राजू शेट्टींनी काल (दि.10) पीएम मोदींसमोर झालेल्या एअर शोचे फोटो पोस्ट करत टीका केलीये आहे. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील पीएम मोदींना तिखट सवाल केले आहेत. तर खासदार शरद पवार यांनी मोदींना महत्त्वाचा सल्ला दिलाय. 

हेही वाचा : Astrology : शक्तिशाली धन योगामुळे, 'या' राशीतील लोकांना मोठा आर्थिक लाभ मिळणार

“आग लगे बस्ती में, हम अपनी मस्ती में”

राजू शेट्टी म्हणाले, “आग लगे बस्ती में, हम अपनी मस्ती में”.... अन्नधान्याच्या टंचाईच्या काळात लालबहाद्दूर शास्त्री यांनी स्वतः दिवसातून एक वेळ जेवण घेऊन जनतेला फक्त भात वर्ज्य करण्याचे आवाहन केले. आणि एक आहेत मोदीजी जे लोकांना परदेश वा-या करू नका , शाळेला न जाता ॲानलाईन शिक्षण घ्या , सोने खरेदी करू नका असे सांगून परदेश दौरे करत आहेत , फायटर जेट विमानांचे सोमनाथ मंदिरात संचलन करत आहेत आणि 100 गाड्यांचा ताफा घेऊन गुजरात दौरा करत आहेत. 

हेही वाचा : 'दारू प्यायल्यावर जे मनात येईल ते करतो..' माजी सैनिकाने 26 तासात केल्या तीन हत्या; नेमकं प्रकरण काय?

हे वाचलं का?