'राज ठाकरे तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत...', सदावर्ते हे काय बोलून गेले?

मुंबई तक

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत जालन्यात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या गाडीवर झालेल्या शाई आणि ऑईल फेकीच्या प्रकारावर संताप व्यक्त केला.

ADVERTISEMENT

referring to mns chief raj thackeray by his first name adv gunaratna sadavarte reacts to incident involving throwing of ink and oil that took place in jalna today
Gunaratna Sadavarte
google news

जालना: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज जालन्यात आपल्या गाडीवर झालेल्या शाई आणि ऑइल फेकण्याच्या प्रकाराची तीव्र निंदा केली. यासोबतच राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका करत वैचारिक लढाईसाठी खुलं आव्हानही दिलं.

सदावर्ते म्हणाले, “राज ठाकरे तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत...” त्यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान देताना सांगितलं की, “राज ठाकरे तू म्हणशील तिथे येतो, आपण वैचारिक चर्चा करू. तू जर हारला तर तू उठाबशा काढ, आम्ही जर हारलो तर म्हणेल ती शिक्षा भोगू.”

सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि मनोज जरांगे यांना प्रश्न विचारला, “तुमची वैचारिक लढण्याची कुवत संपली का? तुम्ही दोघे बाबा लोकं झालेत का?” त्यांनी पुढे म्हटलं, “आजचे लोकं छटाक दारू पिणारे होते का?” अशी जहरी टीका यावेळी त्यांनी केली.

संविधान आणि कायद्याचा दाखला

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी घटनात्मक मूल्यांवर भर देताना स्पष्ट केलं की, “भारताच्या संविधानाचे मेकॅनिझम वाकत नसते. कानून के हात लंबे होते है, और संविधान के हात मजबूत होते है. राज ठाकरेचे दूधखुळे विचार किंवा जरांगेचे कुचे विचार या दोन्ही विचारांसमोर आम्ही थांबणारे व थकणारे नाही.”

हे वाचलं का?