NCP च्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल अन् सुनील तटकरेंना डच्चू? पत्र व्हायरल होताच सुनेत्रा पवारांची पोस्ट

मुंबई तक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नव्या कार्यकारिणीची यादी समोर आली आहे. यामध्ये प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावांचा समावेश नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. तसेच राष्ट्रवादीचा अंतर्गत कलह समोर आल्याची चर्चादेखील रंगली आहे

ADVERTISEMENT

NCP
NCP
google news

बातम्या हायलाइट

point

NCP च्या कार्यकारणीतून प्रफुल्ल पटेल अन् सुनील तटकरेंना डच्चू?

point

पत्र व्हायरल होताच सुनेत्रा पवारांची पोस्ट

NCP Ajit Pawar National Working Committee Members :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नव्या कार्यकारिणीची यादी समोर आली आहे. यामध्ये प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावांचा समावेश नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. तसेच राष्ट्रवादीचा अंतर्गत कलह समोर आल्याची चर्चादेखील रंगली आहे. व्हायरल झालेल्या या यादीवर 29 एप्रिल 2026 ही तारीख असून भारतीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेली ही यादी आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्सवर पोस्ट करत या यादीमध्ये कारकूनी चूक (clerical mistake) झाल्याचे म्हटले आहे.

व्हायरल यादीतील प्रमुख नावे आणि जबाबदाऱ्या :

या यादीनुसार पक्षात मोठा फेरबदल झाल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये एकूण 13 पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

सुनेत्रा अजित पवार : राष्ट्रीय अध्यक्ष

शिवाजीराव गर्जे : खजिनदार (ऑडिट आणि अकाउंट्स)

हे वाचलं का?