पुणे : ब्युटीशियनला प्रियकराने गाडीतच संपवलं, गोरखनाथने आफरीनचा काटा काढला

मुंबई तक

Pune Crime : पुण्यातील मुंढवा परिसरात एका ब्युटीशियनचा तिच्या प्रियकराने कारमध्ये खून केल्याची सनासनाटी घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Pune Crime
Pune Crime
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे : ब्युटीशियनला प्रियकराने गाडीतच संपवलं

point

गोरखनाथने आफरीनचा काढला काटा

Pune Crime News : पुण्याच्या मुंढवा परिसरात एका 29 वर्षीय महिलेचा गळा दाबून खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले असून, पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आफरीन पठाण (वय 29 वर्षे, रा. वडगाव शेरी) असं खून झालेल्या महिलेचं नाव असून ती ब्युटीशियन होती. गोरखनाथ शिंदे (वय 44, रा. चंदननगर, पुणे) याने तिचा गळा दाबून खून केलाय. विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी आफरीनने गोरखनाथकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती, अन्यथा घरी याबाबतची माहिती देईल, अशी धमकीही तिने दिली होती. याच वादातून हा खून झाल्याचं स्पष्ट झालंय. 

हेही वाचा : रुग्णालयात बाईकने एन्ट्री, 7.30 चा टायमर आणि आरोपीचा सीसीटीव्ही; पुण्यात बॉम्ब कोणी ठेवला?

अधिकची माहिती अशी की, आफरीन  पठाण या महिलेचा 5 ते 6 मे 2026 दरम्यान अज्ञात कारणावरून गळा दाबून खून करण्यात आला होता आणि तिचा मृतदेह केशवनगर मुंढवा येथील कचरा डेपोजवळ टाकून देण्यात आला होता. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला होता. फॉरेन्सिक टीमने तपास करुन संशयिताचा शोध घेत असताना पोलिसांनी गोरखनाथ  शिंदे याला ताब्यात घेतले आणि सखोल चौकशी केली असता त्याने या खुनाची कबुली दिली.

हेही वाचा : बीड : थरकाप उडवणारा व्हिडीओ, 4 वर्षीय चिमुरड्यावर भटके कुत्रे तुटून पडले

हे वाचलं का?