नागपूरमध्ये गुलाबजाम मागितल्याने तरुणाने मित्राला चाकूने भोसकलं

योगेश पांडे

14 May 2026 (अपडेटेड: 14 May 2026, 03:53 PM)

Nagpur Crime : नागपूरमध्ये गुलाब जामुनच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाने चाकू भोसकून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गुलाब जामुन देणाऱ्या कॅटरर्स कामगाराचा मृत्यू झाला. संबंधित प्रकरण हे शांति नगर पोलीस ठाणे परिसरात घडल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणातील तीन आरोपींचा देखील समावेश करण्यात आला.

Nagpur Crime

Nagpur Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मित्राने गुलाबजामवरून मस्करी केली 

point

आरोपीने मित्रावर चाकूने हल्ला करत भोसकलं

Nagpur Crime : नागपूरमध्ये गुलाब जामुनच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाने चाकू भोसकून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गुलाब जामुन देणाऱ्या कॅटरर्स कामगाराचा मृत्यू झाला. संबंधित प्रकरण हे शांति नगर पोलीस ठाणे परिसरात घडल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणातील तीन आरोपींचा देखील समावेश करण्यात आला. आयुष चेतनानंद मेश्राम, बादल शेंडे आणि अक्षय नागपुरे अशी तीन आरोपींची ओळख समोर आली. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बीड : थरकाप उडवणारा व्हिडीओ, 4 वर्षीय चिमुरड्यावर भटके कुत्रे तुटून पडले

मित्राने गुलाबजामवरून मस्करी केली 

दरम्यान, बादल आणि अक्षय 9 मे रोजी रात्री कामावरून परतताना, त्याला एका ओळखीच्या मित्राने मस्करीत विचारले की, 'गुलाबजाम' आणले असतील, तर मला दोन खायला दे', म्हणत त्याची खिल्ली उडवली. त्यावर प्रत्युत्तर म्हणून आरोपीने अख्तरला शिवीगाळ केली. थोड्या वेळानंतर, ते आयुष मेश्रामसह आले, नंतर  शिवीगाळ करणे सुरुच ठेवले, नंतर त्यांनी अख्तरला नेमकं काय म्हणाला? असा प्रश्न करून जाब विचारला. 

हे ही वाचा : Astrology : 'या' राशीतील लोकांचं प्रेम उफाळून येणार, तर काही लोकांचं खरं नाही

आरोपीने मित्रावर चाकूने हल्ला करत भोसकलं

पुढे त्याने अख्तरने स्पष्ट केले की, केवळ गुलाबजाम मागितले होते, हे ऐकताच आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला करत भोसकलं, ज्यात त्याच्या मांडीवर मोठ्या जखमा झाल्या होत्या. या घटनेनंतर घायाळ झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर आरोपींना अटक करण्यासाठी शांतीनगर पोलिसांनी पुढील प्रकरणाचा तपास सुरु केला.