पुणे : रुग्णालयात सापडला जिवंत बॉम्ब, पुणेकरांमध्ये घबराट; सीसीटीव्हीत काय दिसलं?

मुंबई तक

• 09:14 AM • 14 May 2026

हडपसरमधील कामधेनु सोसायटी परिसरातील रुग्णालयात बुधवारी (13 मे) रात्री एक जिवंत बॉम्ब आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.

Pune IED Found in Hospital

Pune IED Found in Hospital

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुणे : रुग्णालयात सापडला जिवंत बॉम्ब

point

पुणेकरांमध्ये घबराट

point

सीसीटीव्हीत काय दिसलं?

Pune IED Found in Hospital : पुण्यातील हडपसरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हडपसरमधील कामधेनू सोसायटी परिसरातील रुग्णालयात बुधवारी (13 मे) रात्री एक जिवंत बॉम्ब आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. रुग्णालयात बॉम्ब आढळल्याची बातमी कळताच पुणे पोलीस आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तातडीने घटनास्थळी पोहचले. यावेळी डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत वेळीच हालचाली केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

हे वाचलं का?

मोठा अनर्थ टळला

घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (BDDS) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक पथकाने ही वस्तू सुरक्षितपणे ताब्यात घेऊन ती निकामी केली आहे, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

हे ही वाचा : महाराष्ट्र हादरला, चुलत भावाशी अनैतिक संबंध, शिवानीची बॉडी धडापासून वेगळी; मृतदेह जाळला

कमी तीव्रतेचा आई़डी

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, ती वस्तू म्हणजे कमी तीव्रतेचा आयईडी (IED) असल्याचे सांगितले. सध्या स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा आणि एटीएस (ATS) या प्रकरणाचा तपास करत आहेत. हा स्फोटक पदार्थ तिथे कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवला होता, याचा सखोल शोध पोलीस घेत आहेत.

हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर; मोदींच्या आवाहानानंतर 4 मोठे निर्णय

सीसीटीव्ही समोर

या घटनेनंतर एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय, ज्यात आरोपी इलेक्ट्रिक ओलामधून रूग्णालयात आल्याचं स्पष्ट होतं. त्यानंतरच त्याने अतिदक्षता विभागाच्या बाजूला असणाऱ्या पुरुष स्वच्छता गृहात काही तरी संशयास्पद वस्तू ठेवल्याचा दावा करण्यात येतोय.