महाराष्ट्र हादरला, चुलत भावाशी अनैतिक संबंध, शिवानीची बॉडी धडापासून वेगळी; मृतदेह जाळला
Buldhana Crime : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून, पित्यानेच मुलाच्या मदतीने मुलीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्र हादरला, चुलत भावाशी अनैतिक संबंध
शिवानीची बॉडी धडापासून वेगळी; मृतदेह जाळला
Buldhana Crime : बुलढाणा जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात उघडकीस आली आहे. एका 20 ते 25 वयोगटातील तरुणीचा अर्धवट जळालेला आणि शीर धडावेगळे केलेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण पोलीस दलासमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. प्राथमिक तपासात हा मृतदेह कोणाचा आहे? या हत्येमागे कोणाचा हात आहे? याबाबत कोणतेही धागेदोरे मिळत नव्हते. मात्र, पोलिसांनी फॉरेन्सिक टीम आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने या गुन्ह्याचा छडा लावला असून, यात धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पोटच्या मुलीचा खून खुद्द तिच्या पित्यानेच मुलाच्या मदतीने केल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले असून समाजात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : कल्याण : मोबाईल गेमवरुन वाद, मामाचं भाच्यासोबत भयंकर कृत्य
संशयाचे पर्यवसान एका भीषण हत्याकांडात
या घटनेचा सविस्तर तपास केला असता असे समोर आले की, मृत तरुणीचे नाव शिवानी बापुराम कळमेकर असून ती मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील खडकनार येथील रहिवासी होती. शिवानीचा विवाह काही दिवसांपूर्वीच म्हणजे 15 एप्रिल 2026 रोजी पार पडला होता. लग्नानंतर ती सासरी गेली खरी, पण तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या वडिलांनी या हत्येचा कट रचला. शिवानीचे तिच्याच गावातील चुलत भावासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय तिचे वडील बापुराम नथ्थु कळमेकर यांना होता. याच संशयाचे पर्यवसान एका भीषण हत्याकांडात झाले. आपल्या कुटुंबाची अब्रू गेल्याच्या भावनेतून बापाने स्वतःच्या हाताने मुलीचा जीव घेण्याचे ठरवले आणि त्यासाठी आपल्या मुलाची साथ घेतली.
हेही वाचा : फक्त एक लिंबू उचलला अन् गमावला जीव, अल्पवयीन मुलासोबत काय घडलं?









