राज ठाकरे यांच्या निकटवर्तीयाचा भीषण अपघात, गाडीचा चक्काचूर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर जिल्ह्याचे नेते आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयाचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून पुण्याला जाताना एक्सप्रेस वे वर हा अपघात झाला असून गाडीचा चक्काचूर झाला आहे.

MNS Dilip Dhotre Accident

MNS Dilip Dhotre Accident

मुंबई तक

15 May 2026 (अपडेटेड: 15 May 2026, 12:31 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरे यांच्या निकटवर्तीयाचा भीषण अपघात,

point

गाडीचा चक्काचूर

MNS Dilip Dhotre Accident : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर जिल्ह्याचे नेते आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे दिलीप  धोत्रे यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात धोत्रे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे वाचलं का?

गाडीचा चक्काचूर

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिलीप धोत्रे हे आपल्या खाजगी वाहनाने मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या एक्सप्रेसवेवरील गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यांच्या गाडीचा पुढचा भाग अक्षरश: चक्काचूर झाला. यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

हा अपघात कसा आणि कधी झाला, त्याचे नेमके कारण काय, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा : 'आई व्हायचं नव्हतं..' न्यायाधीशाच्या सुनेचा मृत्यू; हत्या की आत्महत्या?

प्रकृती चिंताजनक

या अपघातात दिलीप धोत्रे यांच्या छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पंढरपूरमधील त्यांचे समर्थक आणि मनसे कार्यकर्ते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

हे ही वाचा : वृद्ध आई-वडिलांसह पुतण्या आणि पुतणीलाही संपवलं, 'त्या' एका कारणामुळे सगळं कुटुंब उद्ध्वस्त

पंढरपूरमधील मनसेचे वजनदार नेते

दिलीप धोत्रे हे पंढरपूर भागातील मनसेचे वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध असल्याने राजकीय वर्तुळात या बातमीने खळबळ उडाली आहे.