वृद्ध आई-वडिलांसह पुतण्या आणि पुतणीलाही संपवलं, 'त्या' एका कारणामुळे सगळं कुटुंब उद्ध्वस्त
कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये एक वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या दोन नातवंडांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वृद्ध आई-वडिलांसह पुतण्या आणि पुतणीलाही संपवलं
'त्या' कारणामुळे सगळं कुटुंब उद्ध्वस्त
Crime News : छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्यातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे, जिथे कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतांमध्ये एक वृद्ध दांपत्य आणि त्यांच्या दोन नातवंडांचा समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी मृत दांपत्याच्याच एका मुलाला आणि नातवाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात मालमत्ता आपल्या नावावर व्हावी यासाठी हा कट रचल्याचे उघड झाले आहे.
कुऱ्हाडीने वार करुन संपवले
ही भयानक घटना शिवरीनारायण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भनवतरा गावात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांचे मृतदेह त्यांच्या बांधकाम सुरु असलेल्या घरामध्ये सापडले. गुरुवारी (14 मे) सकाळी मजूर कामासाठी तिथे पोहोचले असता घरामध्ये चौघांचे मृतदेह पडलेले पाहून त्यांना धक्काच बसला. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली, त्यानंतर घटनास्थळी तपास सुरू करण्यात आला.
मेदनी प्रसाद कश्यप (70 वर्षे), त्यांची पत्नी कांती बाई (65 वर्षे), पीतांबर कश्यप (17 वर्षे) आणि मोगरा (25 वर्षे) अशी मृतांची ओळख पटली आहे. पीतांबर आणि मोगरा हे दोघे त्यांचे नातू आणि नात होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबातील सर्व सदस्य बांधकाम सुरु असलेल्या घरात झोपलेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
हे ही वाचा : जालना : चेहरा, छाती, गळा, हात काहीच सोडलं नाही, प्रेमात पडल्याने 18 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
वडील आणि मुलाला अटक
तपासादरम्यान पोलिसांनी मेदनी प्रसाद यांचा मुलगा सोनसाई आणि त्याचा मुलगा दकेश्वर उर्फ गोलू याला ताब्यात घेतले. असा आरोप आहे की, त्या दोघांनी झोपेत असताना कुऱ्हाडीने वार करून चौघांची हत्या केली. कुटुंबाच्या संपूर्ण मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी आरोपींनी हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी अनेक महत्त्वाचे पुरावेही गोळा करण्यात आले आहेत.









