Maharashtra Weather : राज्यात दुहेरी संकटानंतर आता एप्रिल महिन्याअखेरीस हवामानात मोठा बदल झाला आहे. अवकाळी पावसाचा धोका कमी झाल्यानंतर सूर्यदेव आग ओकणार आहे. याचा आता नागरिकांना मोठा सामना करावा लागणार आहे. काही ठिकाणी उष्माघाताचं सावट आहे. अशातच 27 एप्रिल 2026 रोजी हवामान विभागाने उन्हाचा अलर्ट जारी केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'मिसिंग लिंक'चा मुहूर्त ठरला, टोलच्या दरवाढीबाबत महत्त्वाची माहिती, एकनाथ शिंदेंनी केली पाहणी
कोकण
कोकण विभागात हवामान उष्ण आणि दमट असेल अशी शक्यता आहे. तसेच अवकाळी पावसाचं संकट टळलं आहे, मात्र उन्हामुळे अंगाची लाही लाही होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. मुंबईसह कोकण भागात नागरिकांना उष्णतेचा चांगलाच सामना करण्याची अधिक संभावना आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सावट होते, मात्र बदलत्या हवामानाने हवामान कोरडं आणि स्वच्छ राहील असा हवामानाचा अंदाज जारी केला. अशातच तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होईल उकाडा अधिक जाणवणार आहे, अशा स्थितीत दुपारी नागरिकांनी बाहेर पडताना उन्हापासून आपली काळजी घ्यावी.
मराठवाडा
मराठवाडा विभागात सूर्य आग ओकणार आहे, यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होणार आहे. तसेच हवामान कोरडे राहणार असून तापमानाचा पारा अधिक चढण्याची शक्यता आहे. सोमपारपासून पावसाची शक्यता नसून उष्णता अधिक राहणार आहे.
हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांचा फोटो मॉर्फ करुन आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप, शरद पवार गटाच्या सोशल मीडिया प्रमुखाला अटक
विदर्भ
विदर्भात मोठ्या प्रमाणात सूर्य आग ओकणार असून नागरिकांना ऊन्हाचा अधिक चटका सहन करावा लागणार आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांत उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











