Viral News : विवाह हा जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. अनेकांना असा जीवनसाथी हवा असतो, ज्याच्यासोबत ती व्यक्ती आपलं सुखकर आयुष्य घालवू शकते. योग्य जोडीदार मिळणे हे सोपे नसते, पण काहींना प्रेम मिळते आणि नंतर ते लग्नापर्यंत पोहोचते. अनेकांसाठी हा प्रवास इतका सरळ नसतो, अशा स्थितीत मध्यस्ती लग्नासाठी योग्य जोडीदार मिळवून देतात. लग्नासाठी स्थळ जुळवून देणाऱ्या एका ओएंद्रिया कपूर नावाच्या महिलेनं सोशल मीडियावर एक अनुभव शेअर केला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित? राहुरीत काय होणार? बघा, काय सांगतो एक्झिट पोल..
या पोस्टमध्ये तिने एका आयटी क्षेत्रात पदवीधर असणाऱ्या घटस्फोटित तरुणाच्या मागणीचे वर्णन केले, ज्यामुळे हा वाद निर्माण झाला. भारतात आयआयटी पदवीधरांना एक विशेष दर्जा प्राप्त असल्याचे मानले जाते. हा दर्जा अनेकदा नातेसंबंध जुळवताना महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र, या प्रकरणात समोर आलेल्या अटींना लोकांना आश्चर्यचकित केले.
37 वर्षीय घटस्फोटित तरुणाच्या अपेक्षा
कपूर यांच्या म्हणण्यांनुसार, 37 वर्षीय घटस्फोटित आयआयटी पदवीधर जोडीदाराच्या शोधात ओएंद्रियाकडे आला होता. त्याचे प्रोफाइल उत्तम होते, पण त्याहून अपेक्षा चर्चेचा विषय बनल्या. त्याने स्पष्टपणे सांगितलं की, त्याला 30 वर्षांखालील, अविवाहित किंवा तिचे याआधी कोणत्याही व्यक्तीशी नातेसंबंध नसलेली तरुणी विवाहासाठी अपेक्षित होती.
तरुणी व्हर्जिन असावी अशी तरुणाची मागणी
ओएंद्रिया कपूर यांनी स्पष्टपणे सांगितलं की, तरुणीचा कोणताही भूतकाळ नसावा, तसेच ती व्हर्जिन असावी. याचा अर्थ त्या तरुणीचे यापूर्वीचे नातेसंबंध किंवा जोडीदार नसावा. तसेच ती तरुणी ब्राह्मण समाजातील असावी, असा त्यांचा आग्रह होता. विशेष म्हणून तो तरुण स्वत: घटस्फोटित असून त्यांनी काही अटींवर तडजोड केली जाणार नाही असं जाहीर केले.
हे ही वाचा : काका अशी ओळख सांगून, 6 वर्षीय मुलीला घरात फसवून नेले नंतर नको तेच... लाज आणणारी घटना
जेव्हा कपूरने या अटींवर प्रश्न करण्यास सुरुवात केली, तेव्हा तो आपल्याच निर्णयावर ठाम राहिला. त्याने दावा केला की, काही संशोधनानुसार, अनेक संबंध असलेल्या स्त्रीया कमी विश्वासू असतात. हेच तत्त्व त्यालाही लागू होते का, असे विचारल्यावर तो म्हणाला, नाही, ही तुलना अचूक नाही. नंतर तो म्हणाला की, मी एक पुरुष आहे. कपूरने हे दुटप्पीपणाचे उदाहरण सांगितले. तिने या अशा क्लायंटसोबत काम करण्यास नकार दिला.
ADVERTISEMENT











