डोंबिवलीत रिक्षांवर स्टिकर मोहीम, मनसेची आक्रमक भूमिका; परप्रांतीय रिक्षाचालकांना काय दिला इशारा?

मिथिलेश गुप्ता

26 Apr 2026 (अपडेटेड: 26 Apr 2026, 01:17 PM)

डोंबिवली पश्चिमेतील स्टेशन परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांकडून रिक्षांवर मराठी स्टिकर्स लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. महाराष्ट्रात राहून व्यवसाय करताना मराठी भाषेला दुय्यम वागणूक देणं सहन केलं जाणार नाही, अशी ठाम भूमिका यामागे असल्याचं मनसेनं सांगितलं आहे.

Dombivli News

Dombivli News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

डोंबिवलीत रिक्षांवर स्टिकर मोहीम

point

मनसेची आक्रमक भूमिका

point

परप्रांतीय रिक्षाचालकांना काय दिला इशारा?

Dombivli News : डोंबिवलीत मराठी भाषा आणि स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. “मला मराठी समजते, मी मराठी बोलतो… माझ्या रिक्षात बसा” असा स्पष्ट संदेश देणारी स्टिकर मोहीम मनसेकडून राबवण्यात येत आहे. डोंबिवली पश्चिमेतील स्टेशन परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांकडून रिक्षांवर मराठी स्टिकर्स लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. महाराष्ट्रात राहून व्यवसाय करताना मराठी भाषेला दुय्यम वागणूक देणं सहन केलं जाणार नाही, अशी ठाम भूमिका यामागे असल्याचं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

हे वाचलं का?

का राबवली जात आहे स्टिकर मोहीम?

हा उपक्रम पक्षाचे नेते आमदार प्रमोद (राजूदादा) रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. नगरसेवक संदेश पाटील आणि नगरसेविका रसिका संदेश पाटील यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी विधानसभा सचिव अरुण जांभळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  चार मे रोजी मराठी सक्तीच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपल्या शैलीत उत्तर देण्याचा इशारा दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून ही स्टिकर मोहीम राबवली जात असल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा : पैसा-पाणी : पेट्रोलच्या किमती कधी वाढणार?

परप्रांतीय रिक्षाचालकांचा सकारात्मक प्रतिसाद

रिक्षा ही सामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असताना, त्याच रिक्षांमध्ये मराठी माणसालाच भाषेची अडचण भासते, ही गंभीर बाब असल्याचं मनसेने अधोरेखित केलं आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ स्टिकरपुरता मर्यादित नसून, मराठी भाषेचा सन्मान राखण्याचा संदेश असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, या मोहिमेला परप्रांतीय रिक्षाचालकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

हे ही वाचा : Govt Jobs : स्टेनोग्राफर पदासाठी 731 पदांची भरती, काय आहेत पात्रतेचे निकष? अर्जाची शेवटती तारीख काय?

ही विनंती नसून जबाबदारी

अनेक चालकांनी मराठी समजून घेण्याची आणि बोलण्याची तयारी दर्शवत स्वेच्छेने स्टिकर लावले आहेत. महाराष्ट्रात सेवा द्यायची असेल, तर मराठी भाषेचा आदर करावाच लागेल ही विनंती नसून जबाबदारी आहे, असा स्पष्ट इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. या उपक्रमात विधानसभा सचिव अरुण जांभळे, उपशहराध्यक्ष राजू पाटील, प्रेम पाटील, विभाग अध्यक्ष संजय चव्हाण, कदम भोईर, चेतन म्हात्रे, निलिमा भोईर, शाखा अध्यक्ष नितेश दिपनाईक, शर्मिला लोंढे तसेच मोठ्या संख्येने रिक्षा चालक व मनसे पदाधिकारी उपस्थित होते.