Govt Jobs : स्टेनोग्राफर पदासाठी 731 पदांची भरती, काय आहेत पात्रतेचे निकष? अर्जाची शेवटती तारीख काय?

मुंबई तक

SSC तर्फे स्टेनोग्राफर पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत आणि अर्जाची शेवटची तारीख काय आहे, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Government Jobs
Government Jobs
google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : स्टेनोग्राफर पदासाठी 731 पदांची भरती

point

काय आहेत पात्रतेचे निकष?

point

अर्जाची शेवटती तारीख काय?

Government Jobs : कर्मचारी निवड आयोगाद्वारे (SSC) स्टेनोग्राफर ग्रेड 'C' आणि 'D' पदांच्या भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेद्वारे एकूण 731 रिक्त जागा भरल्या जाणार असून, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने स्टेनोग्राफर ग्रेड 'C' (ग्रुप B) आणि स्टेनोग्राफर ग्रेड 'D' (ग्रुप C) या संवर्गातील पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांची निवड ही संगणकावर आधारित परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या लघुलेखन कौशल्य चाचणीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

पात्रतेचे निकष

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता म्हणून उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. शैक्षणिक अर्हतेसोबतच उमेदवाराकडे संबंधित पदासाठी आवश्यक असणारे लघुलेखन (Stenography) कौशल्य असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेचा विचार करता, 1 ऑगस्ट 2026 रोजी ग्रेड 'C' पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान आणि ग्रेड 'D' पदासाठी 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार, SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

हे ही वाचा : भीषण अपघातात जुन्नरच्या नायब तहसीलदारांचा मृत्यू, हायवा आणि कारची समोरासमोर धडक

अर्ज करण्याची शेवटची तारीख

भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, इच्छुकांनी 15 मे 2026 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील पुरुषांसाठी 100 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग, माजी सैनिक आणि सर्व प्रवर्गातील महिलांना अर्जासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. जर अर्जामध्ये काही त्रुटी राहिल्यास त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी 20 ते 21 मे 2026 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कोठेही नियुक्ती दिली जाऊ शकते.

हे ही वाचा : जिममध्ये सुरु होतं बर्थडे सेलिब्रेशन, तोंडाला फक्त केक लावला अन् घडलं हत्याकांड; किती जणांनी गमावला जीव?

कधी होणार परीक्षा?

या भरतीची संगणकीय परीक्षा जुलै-ऑगस्ट 2026 या दरम्यान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जे उमेदवार लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतील, त्यांना पुढील टप्प्यात कौशल्य चाचणीसाठी पाचारण केले जाईल. स्टेनोग्राफर पदासाठी लागणारी शिस्त आणि कौशल्य पाहता, उमेदवारांनी आतापासूनच तयारीला लागणे हिताचे ठरेल. अधिकृत माहिती आणि सविस्तर जाहिरातीसाठी उमेदवारांनी कर्मचारी निवड आयोगाच्या संकेतस्थळाला (ssc.gov.in) भेट द्यावी.
 

हे वाचलं का?