Maharashtra Weather : राज्यात विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, 18 जिल्ह्यांवर संकट घोंगावणार

मुंबई तक

• 05:00 AM • 03 Jun 2026

Maharashtra Weather : राज्यात मान्सूनपूर्व पावसाची सक्रियतेत वाढ होत असून विविध भागांत हवामान विभागाचा वेगवेगळा इशारा जारी करण्यात आला आहे. अशातच जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात मान्सूनपूर्व पावसाची सक्रियतेत वाढ

point

3 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान

Maharashtra Weather : राज्यात मान्सूनपूर्व पावसाची सक्रियतेत वाढ होत असून विविध भागांत हवामान विभागाचा वेगवेगळा इशारा जारी करण्यात आला आहे. 3 जून 2026 रोजी हवामान विभागाने कोकणातील 4 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे, अशातच जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे... 

हे वाचलं का?

कोकण 

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा अलर्ट वर्तवण्यात आला. या भागांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची अधिक शक्यता असून नागरिकांनी दुपारी उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. याच विभागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांना कोणाताही अलर्ट नसला तरीही काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.  तर सांगली आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांना कोणताही अलर्ट वर्तवण्यात आलेला नाही. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना कोणाताही अधिकृत अलर्ट वर्तवला नसला तरीही काही भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

विदर्भ 

विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ या सात जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट वर्तवला आहे. याच भागांत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.