महाराष्ट्रावर दुहेरी संकट घोंगावतं, 14 जिल्ह्यांत अवकाळी पाऊस घालणार थैमान

Maharashtra Weather : राज्यात हवामानात काही प्रमाणात बदल घडण्याची शक्यता आहे. ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रावर दुहेरी संकट घोंगावत दुहेरी संकट निर्माण होत आहे.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

• 05:00 AM • 26 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात हवामानात काही प्रमाणात बदल घडण्याची शक्यता

point

ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रावर दुहेरी संकट

Maharashtra Weather : राज्यात ऐन उन्हाळ्यात दुहेरी संकट घोंगावत असल्याने संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. कोकणात 26 मार्च 2026 रोजी राज्यात उष्णतेत वाढ होण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाची अधिक शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज जारी केला आहे. जाणून घेऊयात 26 मार्च रोजी राज्यातील एकूण अंदाज.

हे वाचलं का?

हे ही वाचा : हॉटेलवर पोलिसांची रेड, 11 तरुण आणि 4 तरुणी नको 'त्या' अवस्थेत, पोलिसांनी सुट्टी दिली नाही..

कोकण 

कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमच हवामानाचा अंदाज कायम राहील अशी शक्यता आहे. या एकूण जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेचा अलर्ट जारी केला आहे. तर सिंधुदुर्गमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज जारी करण्यात आला. 

मध्य महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरात हलक्या पावसाची अधिक शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवली आहे. कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. तसेच नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात उष्ण आणि कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तसेच बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. 

हे ही वाचा : ब्युटी पार्लरवालीचं सौंदर्य पाहून प्रेमात पडला, शेवटी सगळं काही संपलं; थेट तिच्या दुकानासमोर जाऊन...

विदर्भ 

विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाण्यात सर्वाधिक उष्णता जाणवेल. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला.