Maharashtra Weather: कोकणातील 'या' भागांना ऑरेंज अलर्ट, पुणे, साताऱ्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता

मुंबई तक

• 07:00 AM • 28 Jun 2025

maharashtra weather update : हवामान विभागाने 28 जूनच्या मान्सूनच्या अंदाजाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD)आणि इतर हवामन तज्ज्ञांच्या माहितीनुसार, खालीलप्रमाणे हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

maharashtra weather

maharashtra weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यातील हवामान विभागाचा अंदाज

point

राज्यातील 'या' भागांत मान्सूनचा प्रभाव

Maharashtra Weather Update : हवामान विभागाने 28 जून रोजी मान्सूनच्या अंदाजाबाबतची महत्त्वाची अपडेट दिली आहे. हवामान विभागाने मान्सूनचा प्रभाव राज्याच्या विविध भागांमध्ये दिसून येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD)आणि इतर हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, खालीलप्रमाणे हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : 'यूरिनने स्वच्छ करा आपले डोळे', पुण्यातील महिलेने दिलेल्या टिप्स लोकं संतापली!

कोकण 

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात 28 जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषत: चिपळूण, दापोली, मालवण आणि देवगडमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. कोकणातील हवामानाची परिस्थिती पाहिली तर ढगाळ वातावरण असेल. विशेष म्हणजे रायगड आणि रत्नागिरीसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यापैकी पुणे, सातारा आणि कोल्हापूरात जोराचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मराठवाडा

मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बीड, परभणी आणि लातूरसारख्या काही जिल्ह्यातील भागांमध्ये मुसळधार पावसाच्या शक्यतेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना पेरणी आणि पिकांच्या संरक्षणासाठी योग्य नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. 

हेही वाचा : 'पती मित्राला घेऊन आला घरी, दोघांचे अश्लील चाळे...', 'त्या' गोष्टीने महिला हादरली!

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नाशिक आणि धुळ्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने माहिती दिली आहे.