Maharashtra Weather : राज्यात दुहेरी संकट, 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 12 Jun 2026

Maharashtra Weather : राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने विविध भागांना हवामानाचा इशारा दिला आहे. अशातच राज्यातील एकूण 7 जिल्ह्यांना उष्णतेचा अंदाज वर्तवला आहे. तसेच राज्यात 24 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा इशारा दिला आहे.

Maharashtra weather

Maharashtra weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती

point

24 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात मान्सूनपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने विविध भागांना हवामानाचा इशारा दिला आहे. अशातच राज्यातील एकूण 7 जिल्ह्यांना उष्णतेचा अंदाज वर्तवला आहे. तसेच राज्यात 24 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा इशारा दिला आहे. अशातच 12 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे वर्तवण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : वैद्यकीय उपचाराचा बहाणा, मित्राच्या 7 वर्षीय मुलीला हॉटेलच्या खोलीत..

कोकण 

कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे. किनारपट्टीच्या भागात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज आहे. तसेच मुंबई उपनगर भागातील मुंबई, ठाणे आणि रायगड या ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्ट लागू करण्यात आला. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्टचा अंदाज आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात तसेच जळगाव जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट असला तरीही पुणे घाटमाथ्यावरील परिसरात हलक्या पावसाचा इशारा आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागातील जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला. काही विभागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

हे ही वाचा : गुरू - शिष्याच्या नात्याला काळिमा! शिक्षकाने 5 विद्यार्थिनींवर केले लैंगिक अत्याचार

विदर्भ 

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वाशिम, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.