Maharashtra weather: राज्यात हिवाळ्याची चाहूल, 'या' जिल्ह्यात थंडीचा येलो अलर्ट जारी

Maharashtra Weather : राज्यात हिवाळ्याची चाहूल लागली आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबरला मुंबईत कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 26 अंशांभोवती राहील.

Maharashtra weather

Maharashtra weather

मुंबई तक

• 05:00 AM • 15 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार...

point

राज्यात हिवाळ्याची चाहूल

point

काय सांगतं हवामानशास्त्र?

हे वाचलं का?

Maharashtra Weather : राज्यात हिवाळ्याची चाहूल लागली आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबरला मुंबईत कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 26 अंशांभोवती राहील. दुपारनंतर हलका ढगाळपणा आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे (10-15 किमी/तास वेग) हवेची गुणवत्ता सुधारेल. पावसाची शक्यता फक्त 10 % आहे, म्हणजेच दिवसभर कोरडे हवामान राहण्याची चिन्हे आहेत.

हे ही वाचा : पोटच्या लेकराला आईने जळत्या चुलीत फेकलं, नंतर साडीने गळफास घेत उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबीय म्हणाले, तिचा पती...

सकाळी सूर्योदय 6:45 ला आणि सूर्यास्त संध्याकाळी 6:00 ला होईल. बाहेर पडणाऱ्यांनी हलका उष्णपणा लक्षात घेऊन पाणी भरपूर प्या आणि यूव्ह इंडेक्स 7 असल्याने सनस्क्रीन वापरा. 

मध्य महाराष्ट्रातील पुणे :

पुण्यात हवामान अधिक सुखकारक राहील. 15 नोव्हेंबरला कमाल तापमान 29 अंश आणि किमान 18 अंश सेल्सिअसपर्यंत असेल. सकाळी थंडी वाढेल, पण दुपारी हलका उष्णपणा जाणवेल. पावसाचा धोका नाही, फक्त 3 दिवसांत एकदा हलका सरी येण्याची शक्यता. वाऱ्यांचा वेग 8-12 किमी/तास राहील. तसेच याच विभागातील जळगाव जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

विदर्भातील नागपूर :

विदर्भातही हवामान स्थिर राहील. कमाल तापमान 29 अंश आणि किमान 17 अंश असेल. तसेच ढगाळ वातावरण तयार होऊ हलके वारे वाहतील. पावसाची शक्यता नगण्य बघायला मिळणार आहे.

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात सिंह, झेब्रा पाहता येणार, पण एवढं तिकीट महागणार, कारण...

मराठवाडा आणि कोकण विभाग :

संपूर्ण राज्यात नोव्हेंबर महिन्यात सरासरी 2-3 दिवस पाऊस पडण्याची शक्यता असली तरी उद्या कोरडे हवामान राहील. एकूण पावसाची मात्रा 17 मिमी इतकीच असेल, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे.

 

    follow whatsapp