आरारारारा खतरनाक! पठ्ठ्याने दारूच्या नशेत जिवंत सापाला खाल्लं..नंतर घडली सर्वात भयंकर घटना

Man Ate Snake Shocking Viral News :  बांदाच्या बबेरू कोतवाली परिसरात हरदौली गावात अशोक नावाचा व्यक्ती राहतो. 35 वर्षांच्या अशोकने असं कांड केलं आहे, ज्यामुळे सर्वच हादरून गेले आहेत.

Man Eats Snake Viral News

Man Eats Snake Viral News

मुंबई तक

• 03:48 PM • 17 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

अशोकने जिवंत सापाला खाल्लं अन् नंतर घडलं भयंकर..

point

अशोकसोबत नंतर काय घडलं?

point

गळ्यात साप बांधून फिरणाऱ्याचा झाला मृत्यू

Man Ate Snake Shocking Viral News :  बांदाच्या बबेरू कोतवाली परिसरात हरदौली गावात अशोक नावाचा व्यक्ती राहतो. 35 वर्षांच्या अशोकने असं कांड केलं आहे, ज्यामुळे सर्वच हादरून गेले आहेत. अशोकला दारूचं व्यसन होतं. याच दारूच्या नशेत त्याने असं काही केलं, ज्यामुळे त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. अशोकने एका जिवंत सापाला खाल्ल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. 

हे वाचलं का?

अशोकने जिवंत सापाला खाल्लं अन् नंतर घडलं भयंकर..

रिपोर्टनुसार, अशोक दारूच्या नशेत होता. तेव्हा त्याला एक साप दिसला. त्याने सापाला उचललं आणि चावून चावून खाल्लं. अशोकच्या आईने हा धक्कादायक प्रकार पाहिला, तेव्हा तिच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यानंतर कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली, पण अशोकने तोपर्यंत सापाला खाऊन टाकलं होतं. अशोकने साप खाल्ल्यानंतर कुटुंबियांनी त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. परंतु, अशोकची प्रकृती खूपच बिघडल्याने त्याला सीएचसीमध्ये दाखल करण्यात आलं. 

हे ही वाचा >> Mumbai Tak Baithak 2025: 'त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात 100 टक्के लागू करूच..' CM फडणवीसांची माघार नाहीच, ठणकावून सांगितलं! ठाकरे बंधूंना थेट आव्हान?

अशोकसोबत नंतर काय घडलं?

अशोकवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं जात आहे. त्याला आधी खूप पाणी पाजलं गेलं. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, साप विषारी नव्हता. त्यामुळे तो वाचला. जर साप विषारी असता, तर त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. 

गळ्यात साप बांधून फिरणाऱ्याचा झाला मृत्यू

मध्यप्रदेशच्या गुणा येथेही धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने गळ्यात विषारी नागाला बांधून तो बाईकवर राईडसाठी निघाला होता. त्याचदरम्यान त्याला रील काढण्याचा मोह आवरला नाही. परंतु, नागाने फणा काढून त्याला दंश केल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती सर्पमित्र होता. पण त्याने चुकीच्या पद्धतीत सापाला हाताळल्याने त्याला जीव गमवावा लागला. 

हे ही वाचा >> ग्राहकांसाठी खुशखबर! सोनं पुन्हा झालं स्वस्त..तुमच्या शहरातही सोन्याची चमक उतरली, वाचा आजचे दर

    follow whatsapp