ग्राहकांसाठी खुशखबर! सोनं पुन्हा झालं स्वस्त..तुमच्या शहरातही सोन्याची चमक उतरली, वाचा आजचे दर
Gold Rate Today : श्रावण महिन्याची सुरुवात होण्याआधीच सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी 17 जुलै 2025 रोजी सोन्याच्या दरात 100 रुपयांची घट झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Gold Rate Today : श्रावण महिन्याची सुरुवात होण्याआधीच सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी 17 जुलै 2025 रोजी सोन्याच्या दरात 100 रुपयांची घट झाली आहे. देशातील प्रमुख बुलियन मार्केट्समध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 99400 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91000 रुपयांच्या पुढे गेले आहेत.
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99420 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91140 रुपये झाले आहेत. चांदीच्या किंमतीतही 100 रुपयांनी घट झाली असून प्रति किलोग्रॅम चांदीचे दर 113900 रुपयांवर पोहोचले आहेत. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती..
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99330 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91050 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99330 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 91050 रुपये झाले आहेत.










