MHADA Lottery : सर्वसामान्यांना मुंबईत परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाने पुन्हा एकदा आनंदाची बातमी दिली आहे. मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी म्हाडाची लॉटरी निघाली आहे. जवळपास 900 घरांसाठी ही लॉटरी निघाली आहे. याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
इतक्या घरांसाठी निघणार लॉटरी
मुंबईतील जोगेश्वरी येथे असलेल्या पीएमपीजी वसाहतीचा लवकरच पुनर्विकास होणार आहे. 27 हजार 625 चौरस मीटर इतकी या वसाहतीची जागा आहे. या मधील अर्ध्या जागेवर मूळ रहिवाशांसाठी इमारती बांधल्या जाणार आहेत, तर उर्वरित जागेवर बांधल्या जाणाऱ्या इमारतींसाठी लॉटरी निघणार आहे. त्यामुळे जवळपास 800 ते 900 घरांसाठी ही लॉटरी निघेल. यामुळे मुंबईत सुसज्ज घर घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसामान्यांना चांगली संधी चालून आली आहे.
हे ही वाचा : Personal Finance: 40 हजार पगार असलेल्यांनी Credit Card चा महिन्याला किती करावा वापर?
मध्यम व अल्प उत्पन्न गटासाठी घरे
याठिकाणी विक्रीसाठी 17 इमारती बांधल्या जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी 550 घरे असतील. अल्प उत्पन्न गटासाठी 300 ते 350 घरे असतील. या घरांचा आकार 450 चौरस फुटांचा असेल. हा परिसर विमानतळ परिसरात (फनेल झोन) असल्याने या इमारतींची उंची 55 ते 56 मीटरपर्यंत मर्यादित असेल. अशा परिसरात सुरक्षिततेसाठी इमारतींच्या उंचीवर मर्यादा घातली जाते.
हे ही वाचा : एप्रिलमध्ये तयार होतोय त्रिग्रही महायोग, सूर्य, मंगळ आणि शनीती युती; 'या' राशींचे भाग्य उजळणार
घरांसाठी निघणार लॉटरी
या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी साधारणत: 450 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. हा पुनर्विकास झाल्यानंतर याठिकाणी तयार होणारी नवी घरं ही लॉटरी पद्धतीने विकली जाणार आहेत. जोगेश्वरीमधील या वसाहतीचे बांधकाम 1990 मध्ये झाले होते. 17 इमारती असलेल्या या वसाहतीत 42 व्यावसायिक गाळे आणि 942 निवासी घरे आहेत.
ADVERTISEMENT











